मुंबई

मान्सून शेवटच्या टप्प्यात पोहोचला, पुढील आठवड्यापासून परतीचा प्रवास सुरु होणार

समीर सुर्वे

मुंबई, ता.24 : देशात मान्सून शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. पुढील आठवड्यापासून परतीचा प्रवसा सुरु होणार आहे. तर, मुंबईतून 8 ऑक्टोबरच्या आसपास मान्सून परतण्यास सुरवात होईल. तर, बुधवारी मुंबई धुवून काढल्यानंतर गुरुवारी आज पावसाने दडी मारल्याने कमाल तापमानत 3 अंशा पर्यंत वाढ झाली. तर येत्या सोमवारपर्यंत मुंबईसह संपुर्ण कोकणात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

राजस्थानच्या पश्चिम भागातून 28 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. तर मुंबई परीसरातून दरवर्षी 28 सप्टेंबर पासून मान्सून परतण्यास सुरवात होते. मात्र,यंदा हा प्रवास 8 ऑक्टोबर पासून सुरु होणार होणार आहे. यंदा मान्सून मुंबईत 16 जून रोजी दाखल झाला होता.

मंगळवार रात्रीपासून बुधवार रात्रीपर्यंत मुंबईत विक्रमी पाऊस नोंदविण्यात आला होता. मात्र, गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला. अधून मधून काही सरी कोसळ्याल्या. सर्वाधिक पावसाची नोंद वरळी 52.2 मिमी, माझगाव 36.6 मिमी झाली. पावसाचा जोर ओसरल्याने कमाल तापमानात वाढ झाली. मात्र, मंगळवार बुधवारच्या पावसाच्या प्रभावाने उष्मा जाणवला नाही.

कुलाबा येथे गुरुवारी सकाळपर्यंत 24 तासात  कमाल तापमान 26.7 अंश आणि सांताक्रुझ येथे 26.2 अंश नोंदविण्यात आले होते. तर संध्याकाळपर्यंत कुलाबा येथे कमाल 30.2 आणि किमान 23.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ येथे कमाल 30.6 आणि किमान 23.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात फारसा बदल झाला नाही. सोमवारपर्यंत संपुर्ण कोकणात हलक्या सरी होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला असून पुढील उद्याही तापमान याच पातळीवर राहाणार आहे.

( संपादन - सुमित बागुल ) 

monsoon in its last phase return journey of monsoon will start from next week

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT