monsoon 
मुंबई

मान्सून मुंबईच्या उंबरठ्यावर; येत्या 24 तासांत राज्यभरात होणार सक्रिय...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : नैर्ऋत्य मोसमी पावसाने शनिवारपर्यंत कोकणातील हर्णे, मध्य महाराष्ट्रातील नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील गोंदियापर्यंत मजल गाठली. येत्या 24 तासांत मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस सक्रिय होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, शनिवारी रात्रभर मुंबईत पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शनिवारी मुंबईत दिवसभर आकाश ढगाळ होते. परंतु, वातावरणात उकाडा होता. सायंकाळी दादर, वरळी व अन्य ठिकाणी हलक्या सरी पडल्यामुळे नागरिकांची घामाच्या धारांपासून सुटका झाली. रत्नागिरीत एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, सायंकाळी नाशिकमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.  येत्या 24 तासांत राज्याच्या किनाऱ्यावर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

मुंबईत कमाल तापमान कुलाबा येथे 32.4 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 32.6 अंश सेल्सिअस होते.  कुलाबा येथे 85 टक्के आणि सांताक्रूझ येथे 73 टक्के आर्द्रता नोंदवण्यात आली. आर्द्रतेत वाढ झाल्यामुळे उकाडा जाणवत आहे.

चार-पाच दिवसांत मुसळधार
येत्या 24 तासांत आकाश सामान्यतः ढगाळ राहून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या चार-पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुत्ते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT