मुंबई : मुंबईत मंगळवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामूळे रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दरम्यान दुपारपासूनच मस्जिद रोड ते भायखळा दरम्यान रुळावर पाणी साचल्याने दोन लोकल ट्रेन अडकल्या होत्या दरम्यान, त्यातील सुमारे 200 अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना CSMT आरपीएफ टीम, वाडीबंदर आरपीएफ टीम, NDRF आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर सुरक्षीत बाहेर काढण्यात आलंय.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतला जाणाऱ्या पहिल्या ट्रेनमधून सुमारे 160 प्रवाशांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येत असलेली लोकलसुद्धा मस्जित बंदर येथे अडकली होती. दरम्यान त्यामधून सुमारे 75 प्रवाशांना बाहेर सुरक्षीत काढण्यात आले आहे.
हेही वाचा : सर्वात मोठी बातमी : मुंबई हाय अलर्टवर, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला तातडीचा आढावा
यामध्ये सिएसएमटी आरपीएस पोलिस निरीक्षक संदीप किरीटकर आणि वाडीबंदर आरपीएफ पोलीस निरीक्षक सुरेश कांबळे यांची टीम आणि स्थानिक नागरिक आणि एनडीआरएफच्या टीमने ही कामगीरी बजावली. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने अडकलेल्या लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. तात्पुरत्या निवाऱ्यात आता या प्रवाशांना सोडण्यात आले आल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए के जैन यांनी सांगितले.
( संकलन - सुमित बागुल )
more than 200 local train travellers rescued from masjid railway station
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.