police 
मुंबई

Lockdown : पोलिसांवर हल्ले करणाऱ्या 300 पेक्षा अधिक जणांना अटक

सकाळवृत्तसेवा

अंधेरी : कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनातर्फे लाॅकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे; मात्र या अंमलबजावणीची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवरच या काळात नेहमीपेक्षा अधिक हल्ले झाले. लाॅकडाऊनमध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या अशा 363 जणांना आतापर्यंत अटक केले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली; तर लॉकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी 95 हजार गुन्हे दाखल झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनाशी लढत आहे; मात्र काही दुष्टप्रवृत्तीचे लोक या त्यांच्यावर हल्ला करत आहे. अशा प्रवृत्तींना ठेचून काढून कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस विभागाला दिल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

लाॅकडाऊन काळातील महत्वाची आकडेवारी 

  • पोलिसांवर हल्ला केल्याच्या 184 घटना.
  • एकूण 363 हल्लेखोरांना अटक
  • लॉकडाऊन उल्लघंनाचे  96 हजार गुन्हे दाखल 
  • एकूण 18 हजार 722  जणांना अटक 

दंडात्मक कारवाई

  • 3 कोटी 51 लाख 38 हजार 694 रुपये वसूल 
  • लॉकडाऊन काळात 100 नंबरवर तब्बल 84 हजार 945 नागरिकांचे कॉल 
  • हातावर क्वारंटाईनचा शिक्का घेऊन फिरणाऱ्या 642 लोकांना पोलिसांनी हुडकून काढून त्यांना विलगिकरण कक्षात पाठवले 
  • कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 2 लाख 11 हजार 538 लोकांना क्वांरटाईन केले
  • वाहतूक उल्लंघनाचे 1279 गुन्हे; 53 हजार 71 वाहने जप्त 
  • बेकायदेशीर वास्तव्याचे 16 परदेशी नागरिकांवर गुन्हे 
  • चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु. यात मुंबईतील 3 आणि पुण्यातील 1
  • राज्यात 42 पोलिस अधिकारी, आणि 494 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित
  • राज्यात 4 हजार 808 रिलीफ कॅम्प
  • या कॅम्पमध्ये 4 लाख 42 हजार 298 लोकांची व्यवस्था

कोरोना हद्दपार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्या म्हणून कोरोना संपला असे नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावून नियम पाळण्याची नितांत आवश्यकता आहे.

- अनिल देशमुख, गृहमंत्री

More than 300 people arrested for attacking police

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

खलनायक ते राजकारणी: ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचा प्रवास थांबला; 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT