mumbai-covid.jpg 
मुंबई

मुंबईत काय आहे आजची कोरोनाची स्थिती, जाणून घ्या...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईत आज एकूण 4758 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत, तर आज 10 मृत्यूंची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्ण ही वाढले असून मुंबईतील सक्रिय रुग्णांनी 49,167 हजारांचा टप्पा गाठला आहे. सक्रिय रुग्ण वाढत असल्याने चिंता ही वाढली आहे. मुंबईत आज तब्बल 4758 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 4,09,320 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 671 वर पोहोचला आहे. 

दरम्यान 3034 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 3,47,530  रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. मुंबईत सध्या 49,167 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के आहे. 
कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर - 1.34 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 50 दिवसांवर आला आहे. आतापर्यंत 40,41,810 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. 

मुंबईत आज मृत झालेल्या 6 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 06 पुरुष तर 04 महिला रुग्णांचा समावेश होता. 1 रुग्ण 40 वयाच्या खालील तर 2 रुग्ण 40 ते 60 वयाच्या दरम्यान व 7 रुग्णांचे वय 60 वर्षाच्या वर होते. 

मुंबईत 69 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 602 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 22,734 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 897 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.  

धारावीत 37 नवे रुग्ण
धारावीत आज 37 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 4871 वर पोहोचली आहे. तर 525 सक्रिय रुग्ण आहेत. दादर मध्ये आज सर्वाधिक 84 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 6020 वर झाली आहे तर 773 सक्रिय रुग्ण आहेत. माहीम मध्ये 57 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 6091 इतके झाले आहेत. तर 891  सक्रिय रुग्ण आहेत. जी उत्तर मध्ये आज 178 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 16982 झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी; राज्य सरकारचा मोठा निर्णय, पण ॲलोपॅथिक डॉक्टरांचा विरोध

Stock Market IPO : या IPO ला तब्बल 1000 पट सब्स्क्रिप्शन; GMP मध्येही चमक, गुंतवणूकदारांना पैसा डबल करण्याची संधी?

Pune Election : तीन दिवसांत ६७२ अर्ज नेले; नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारांची गर्दी; मात्र प्रत्यक्षात फक्त एक अर्ज दाखल!

Ambegaon Political : युती-अनिश्चिततेत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; बालाजीनगर प्रभागात पाचही जागा स्वबळावर लढवणार!

Latest Marathi News Live Update : बर्च बाय रोमियो लेन आग प्रकरणातील लुथरा ब्रदर्स यांच्या पोलीस कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT