मुंबई

आईच्या दुधापासून तयार होऊ शकते कोरोनाच्या अँटीबॉडीज ?

सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोरोनामुळे जग संकटात सापडलं आहे. जगात कोरोनाचे तब्बल ४१ लाखांपेक्षा जास्त रुग्ण रुग्ण आहेत तर २ लाख ७९ हजारांच्या वर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. मात्र यावर कुठलीही लस तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आलं नाहीये. मात्र आईच्या दुधापासून कोरोनाही अँटीबॉडी तयार केली जाऊ शकते असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. 

नवजात बालकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या आईच्या दुधातच तयार झालेल्या अँटीबॉडीजचा वापर केला जाऊ शकतो असं एका अभ्यासादरम्यान समोर आलं आहे.  द जर्नल ऑफ क्लिनिकल माइक्रोबायोलॉजीमध्ये या संबंधीची माहिती देण्यात आली आहे. 

कोरोनापासून नवजात बालकांचा बचाव करण्यासाठी आईचं  दुधात असलेल्या अँटीबॉडीज उपयुक्त आहेत. त्यामुळे ज्या बाळंतीण  महिलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यांना त्यांच्या बाळांना स्तनपान करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. 

आईच्या दुधातुन कोणत्याही प्रकारचे व्हायरस बाळाच्या शरीरात जात नाहीत. त्यामुळे बाळाला आईचं अँटीबॉडीज युक्त दूध देणं हे बाळाला कोरोना व्हायरसपासून दूर ठेवेल असं 'द इकना स्कूल ऑफ मेडिसिन'च्या  'रेबेका पॉवेल' यांनी सांगितलंय. 

कोरोनाची लागण झालेल्या काही  बालकांमध्ये डॉक्टरांना विचित्र आणि नवीन अशी लक्षणं आढळून आलीत याला "पीडियाट्रिक मल्टी-सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम असं म्हणतात. हे लक्षणं कोरोना व्हायरसचेच आहेत आणि त्यामुळे बालकांमध्ये  निरनिराळ्या प्रकारचे विकार आढळून येत आहेत ज्यांचा परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ शकतो असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय. त्यामुळेच अँटीबॉडीजयुक्त आईचं दूधच बाळासाठी उपयुक्त आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय.

mothers milk may creates corona antibodies see what researchers are saying

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT