मुंबई

Mukesh Ambani: स्फोटकासोबत सापडलेल्या बनावट नंबरप्लेटबाबत धक्कादायक माहिती उघड

पूजा विचारे

मुंबई: रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळाली. त्यात जिलेटीन सापडल्यामुळे गुरूवारी एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक आणि  नाशक पथकाच्या मदतीने जिलेटीनच्या कांड्या सुखरुप बाहेर काढण्यात आल्या आहेत. दरम्यान संशयास्पदरित्या स्फोटक भरून आलेली गाडी ही विक्रोळी येथून चोरी झाल्याची माहिती आता समोर येत आहे.  

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ कार ही मुंबईतल्या विक्रोळी या भागातून चोरीला गेली होती. सात ते आठ दिवसांपूर्वी ही गाडी चोरी झाली होती. तशी तक्रार विक्रोळी पोलिस ठाण्यात केली असल्याची माहिती मिळतं आहे. यावरून आरोपींनी संपूर्ण कट रचूनच हा फक्त इशारा दिला होता.

अंबानीच्या बंगल्याबाहेर स्फोटाकसोबत सापडलेल्या गाडीत ज्या नंबरप्लेट सापडल्या त्याची आरटीओ बेसवरची माहिती

MH 04 DN 9945 

गाडीचा नंबर ठाणे आरटीओ रजिस्ट्रेशनचा आहे. पण या नंबरवरुन तपासणी केली असता गाडीचे पूर्व मुंबई आरटीओ मधून रजिस्ट्रेशन केले असून गाडी “कोलंबिया एम्बसी, परदेशी गाडी” असं रजिस्ट्रेशनमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ही गाडी 
12 वर्षे जुनी असून रजिस्ट्रेशनमध्ये गाडी पांढऱ्या रंगाची ह्युंदाई वेरना गाडी असं नमूद केलं आणि गाडीचे रजिस्ट्रेशन मुंबई पूर्व आरटीओ येथील दाखवण्यात आलं आहे. लकी डी नावानी गाडी मालकाचे नाव सांगण्यात आले आहे. गाडी मुंबईच्या मुलूंड येथील असल्याचे नमूद आहे.

MH 01 BU 6510 

गाडीचा नंबर मध्य मुंबई आरटीओमध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालक एक अति महत्वाच्या व्यक्तीच्या कंपनीच्या नावे असल्याचे नमूद आहे. गाडी ६ वर्षे जुनी आहे आणि हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढ-या रंगाची स्कॉर्पिओ आहे RTO रजिस्ट्रेशन मध्ये नमूद आहे.

MH 01 CZ 7239

गाडीचा नंबर मध्य मुंबई आरटीओमध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले.गाडी मालकाचे नाव रजिस्टरमध्ये निशांत सुर्वे असे नमूद करण्याच आले. गाडी ही हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढ-या रंगाची जॅग्वार रेंज रोवर असल्याचे रजिस्टरमध्ये नमूद आहे.

MH 01 DK 9945

या गाडीचा नंबर देखील मध्य मुंबई आरटीओमध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले. गाडी मालक एक अति महत्वाच्या व्यक्तीच्या कंपनीच्या नावे असल्याचे नमूद आहे.  गाडी १ वर्षे जुनी आहे आणि हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढऱ्या रंगाची रेंज रोवर गाडी आहे असं  RTO रजिस्ट्रेशन मध्ये नमूद आहे.

गाडीची ओळख लपवण्यासाठी आरोपींनी गाडीचा चेसी नंबर आणि इंजिन नंबर ही खोडलेला आहे.

Mukesh Ambani information about fake number plate found Scorpio Car Revealed

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT