Sandesh Dalavi 
मुंबई

मुंबई : दहिहंडीच्या थरावरुन पडल्यानं २४ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

उपचारांदरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नुकत्याच झालेल्या दहिहंडी उत्सवात हंडी फोडताना सर्वात वरच्या सातव्या थरावरुन खाली पडल्यानं एका २४ वर्षीय संदेश दळवी नामक तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण खाली पडतानाचा थरारक व्हिडिओ देखील व्हायरलं झाला आहे. मुंबईतील विलेपार्ले इथं ही घटना घडली. मुख्यमंत्र्यांनी नुकताच या खेळाला साहसी खेळाचा दर्जा बहाल केला आहे. (Mumbai 24 year old Govinda dies after falling from dahihandi top floor video viral)

सूत्रांच्या माहितीनुसार, संदेश साळवी (वय २४) असं या तरुण गोविंदाचं नाव असून तो विलेपार्ले येथील शिवशंभो मंडळाच्या दहिहंडी पथकात होता. या दहिहंडीत तो सर्वात वरच्या सातव्या थरात होता. हंडी फोडल्यानंतर एकाबाजूला तोल जाऊन तो खाली जमिनीववर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या डोक्यावर रविवारी शस्त्रक्रियाही पार पडली पण आज (सोमवार) त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, दहिहंडीचा उत्सव यंदा जोरदार साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक सुटीही जाहीर केली होती. तसेच दहिहंडीचा समावेश साहसी खेळामध्ये करत गोविंदांना सरकारी नोकरीत खेळाच्या कोट्यातून ५ टक्के आरक्षणही जाहीर केलं होतं. तसेच या खेळात जखमी झालेल्या गोविंदाला सरकारी रुग्णालयात मोफत उपचार, अपगंत्व आल्यास विमा कवच तसेच मृत्यू झाल्यास नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत अशा अनेक घोषणा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT