corona 
मुंबई

मुंबईत रुग्णांचा आकडा पोहोचला ४४ हजारांवर; जाणून घ्या आजची आकडेवारी..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: एकीकडे मुंबईत आणि राज्यात सरकार लॉकडाऊनचे नियम शिथिल करत आहे. तर दुसरीकडे मात्र मुंबईत  कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल 44 हजारांच्या पार पोहोचला आहे. 

मुंबईत  कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत 1,442 नवीन रुग्णांची भर पडली असून  एकूण रुग्णसंख्या 44,704 झाली आहे. तर आज  48 जणांचा मृत्यू झाला असून  मृतांची एकूण संख्या 1465 झाली  आहे.  

मुंबईत आज 48 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 1465 वर पोचला आहे. आज नोंद झालेल्या 48 मृत्यूंपैकी 33 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 33 पुरुष तर 15 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 7 जणांचे वय 40 च्या खाली होते. तर 23 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर  18 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.

हेही वाचा: 'वंदेभारत' अभियानातून चार हजार प्रवासी राज्यात दाखल; जूनअखेर आणखी 38 उड्डाणे
 

संशयित रुग्णांमध्ये ही वाढ झाली असून आज एकूण 845 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 34065 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 626 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  18,098 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

mumbai 44 thousand mark of corona patients read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: आधी डोक्यात टीव्ही फोडला, नंतर हंड्याने बेदम मारहाण, पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; ठाण्यात काय घडलं?

Latest Marathi News Live Update : ३ महिन्यांच्या मुलीला गटारात फेकून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली आरोपी वडिलांना अटक

Obesity Care: लठ्ठपणाविरोधातील लढ्याला चालना; वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे अत्याधुनिक ऑबेसिटी क्लिनिकची सुरुवात

"दुनियादारीनंतर मी हवेत होतो" संजय जाधव यांचा धक्कादायक खुलासा "सेटवर मी टाईमपास केला"

Bakri Eid Goat Market: तळेगाव ढमढेरे बाजारात बोकडाला ८० हजार रुपये बाजार भाव, विक्रमी आवक

SCROLL FOR NEXT