Mumbai, Ahmedabad, bullet train, bullet train First look sakal
मुंबई

Mumbai Ahmedabad Bullet Train: मोठी बातमी : बहुचर्चित बुलेट ट्रेनच्या कामाला मुंबईत सुरुवात !

Chinmay Jagtap

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुंबईतील कामांनाही सुरुवात झाली आहे. संपूर्ण मार्गातील एकमेव भूमिगत स्थानक असलेल्या बीकेसी टर्मिनसच्या कामालाही सुरुवात झाली आहे. स्थानकाच्या पायाभरणीचे काम सुरू झाल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) दिली.

एनएचएसआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक बांधण्यासाठी आवश्यक असलेली सुमारे ४.८ हेक्टर जमीन नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने कंत्राटदाराला दिली आहे. बॉटम-अप पद्धतीचा वापर करून स्थानक बांधले जाईल. जमिनीच्या पातळीपासून खोदकाम सुरू होईल आणि पायापासून काँक्रीटचे काम सुरू होईल. स्थानकासाठी आवश्यक उत्खनन ३२ मीटर खोल आहे.

ते अंदाजे १८ लाख घनमीटर इतके आहे. ते सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आणि माती कोसळण्यापासून रोखण्यासाठी ग्राऊंड सपोर्ट सिस्टीम तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये सुमारे १७ ते २१ मीटर खोल ३,३८२ सॅकंट पाईल (जमीन ढासळू नये म्हणून केली जाणारी योजना) उभारले जातील. ते विशिष्ट अंतराने आणखी मजबूत केले जातील.

सध्या प्राथमिकतेने त्यांची उभारणी सुरू आहे. सद्यस्थितीत बीकेसी बांधकाम स्थळी ५५९ मजूर आणि पर्यवेक्षक रात्रंदिवस काम करत आहेत. कामाला जशी गती मिळेल, त्याप्रमाणे कर्मचारी संख्या अंदाजे सहा हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

असे असेल स्थानक

तळमजला

- स्थानक प्रवेश

- वायुवीजन झोत

- सुरक्षा रक्षक आणि स्क्रिनिंग

पहिला तळमजला

- उपकरणे खोली

दुसरा तळमजला

- बिझनेस क्लास आणि विश्राम कक्ष

- तिकीट खिडकी, टीव्हीएम आणि नागरी सुविधा कक्ष

- व्यावसायिक दुकाने

तिसरा तळमजला

- सहा फलाट

- प्लॅटफॉर्म ऑपरेशनल रूम

- स्टेशन कंट्रोल रूम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT