corona mumbai 
मुंबई

मुंबईकरांची डोकेदुखी वाढली! एकट्या मुंबईत 1500 नवे कोरोनाबाधित, जाणून घ्या एकूण रुग्णसंख्या

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  मुंबईत कोरोना रुग्णांनी रविवारी उच्चांक गाठला. मुंबईत नव्या 1571 रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 19,967 वर पोहोचला आहे. रविवारी 38 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 734 वर पोहोचला आहे. दगावलेल्या 38 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू हा 8 ते 15 एप्रिल दरम्यान झाले आहेत.  

रविवारी सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 590 रुग्ण आठवड्यापूर्वीचे आहेत; तर 981 रुग्ण आज सापडले आहेत. आजच्या 38 मृतांपैकी 23 जणांना दीर्घकालीन आजार होते. त्यात 28 पुरुष तर 10 महिला आहेत. मृत झालेल्या रुग्णांपैकी तिघे 40हून कमी वयाचे होते. 20 रुग्ण 60 वयापुढील होते. उर्वरित 15 रुग्ण 40 ते 60 वयोगटातील होते. मुंबईतील संशयित रुग्णांमध्येही वाढ झाली असून आज एकूण 678 नवे संशयित रुग्ण सापडले.

आतापर्यंत 19,350 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज 206 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 5012 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

In Mumbai alone, 1500 new corona positive are in a day read in detail

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT