मुंबई

अँटिलिया स्फोटक प्रकरण : पुढील तपास (ATS) दहशतवाद विरोधी पथकाकडून होणार - गृहमंत्री अनिल देशमुख

अनिश पाटील

मुंबई .5 : मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा आणि ठाणे येथील घटनेचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज  दिली.

गृहमंत्री देशमुख म्हणाले, "मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थ सापडलेली स्काॅर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. आज रेतीबंदर या ठिकणी मनसुख  हिरेन यांचा मृतदेह सापडला. अंगावर कोणत्याही खुणा नाहीत. ठाणे पोलिस त्याची चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवालात सर्व बाबी स्पष्ट होतील. महाराष्ट्र पोलिस, मुंबई तसेच ठाणे पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सक्षम आहेत, असेही देशमुख म्हणाले.

विरोधी पक्षाने या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी विधानसभेत केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलिस यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे हा तपास महाराष्ट्र पोलिसच्या 'एटीएस'कडून करण्यात येईल. तसेच या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे ही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

mumbai antilia bomb scare further investigation will be done by anti terrorist squad

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

Patna Mother Murder : मुलानेच आईला जिवंत जाळलं; पोलिसांना म्हणाला- ‘मी देवाचा अवतार, कलियुग सुरूय, मीच तिला संपवलं'

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; TMC नाव आणि पारंपरिक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

Badrinath Military Exhibition : बदरीनाथमध्ये मुख्यमंत्र्यांचा रायफल हातात घेत नेमबाजीचा सराव; लष्करी प्रदर्शनाची घेतली पाहणी

SCROLL FOR NEXT