Crime esakal
मुंबई

Mumbai:चोरी करताना पडकले म्हणून पोलिसांवर हल्ला,एकाला अटक दुसरा चोर फरार

तक्रारदार प्रशांत धुरी पवई पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. पवई पोलिसांचे पथक बुधवारी रात्री परिसरात गस्त घालत असताना दोन चोर तेथील एका दुकानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई-चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पकडणाऱ्या पोलिसावर चोराने चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार पवई येथे बुधवारी रात्री घडला.

या हल्ल्यात पोलीस शिपायाच्या छातीवर गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी हत्येचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एक आरोपी सुब्रतो चित्तरंजन दास याला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

तक्रारदार प्रशांत धुरी पवई पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. पवई पोलिसांचे पथक बुधवारी रात्री परिसरात गस्त घालत असताना दोन चोर तेथील एका दुकानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले.

पोलीस पाहात असल्याचे लक्षात येताच दोन्ही चोरांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक चोर पळण्यात यशस्वी झाला. पण तेथे तैनात असलेल्या वाहतूक पोलिसाने दुसऱ्या चोराला पकडले. त्यावेळी आरोपी सुब्रतो चित्तरंजन दास या आरोपीला पवई पोलिसांच्या ताब्यात देत असताना आरोपीने त्याच्याकडील चाकू धुरी यांच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला.

स्वतःला वाचवण्यासाठी धुरी मागे सरकले असता त्यांच्या उजव्या बरगडीवर चाकुमुळे गंभीर जखम झाली. या प्रकारानंतर इतर पोलिसांनी दासला पकडले. धुरी यांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

धुरी यांच्या तक्रारीवरून दासविरोधात हत्येचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दास हा गोवंडी येथील रहिवासी असून सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात दोन चोरीचे गुन्हे नोंद आहेत. याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: नवऱ्याला नीळ्या ड्रममध्ये मारणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून प्रशासनही थबकलं; प्रियकराला दाखवायचा आहे नवजात मुलीचा चेहरा!

School Timing Change : वाढत्या थंडीमुळे शाळांच्या वेळेत बदल शाळांचा निर्णय; मुलांसह पालकांना दिलासा

Success Story: पारळ्याच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला भूवैज्ञानिक; कैलास आहेर यांचे लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र भूजल सेवा परीक्षेमध्ये यश

Vote Count Discrepancy Sangli : आष्टा नगरपालिका निवडणुकीत मतांच्या आकडेवारीत तफावत, जयंत पाटलांची एन्ट्री होताच काय घडलं; राड्याचा इशारा

Gold Silver Loot : ज्वेलरी फोडून १९ किलो चांदी ७०० ग्रॅम सोनं चोरलं, आराम बस बूक करून पुण्याला निघाला पण...; किणी टोल नाक्यावर थरार

SCROLL FOR NEXT