मुंबई

मुंबई : समुद्र किनारे पुन्हा काळवंडले; तिसऱ्यांदा तेल गळती

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबई लगतच्या समुद्रात (Mumbai sea) पुन्हा एकदा तेल गळती झाल्याने पाण्यावर काळसर तवंग पसरलं आहे. त्यामुळे समुद्र किनारे काळवंडले असून खारपुटी (Mangroves) तसेच समुद्री जीव धोक्यात आले आहेत. यावर कडक कारवाईची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. यापूर्वी दोन वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यावेळी देखील गिरगाव चौपाटीवर (Girgaon beach) रासायनिक कचरा जमला होता. शिवाय चौपाटीवरील वाळू काळवंडली (Black sand) होती. गेल्या दोन महिन्यात आता तिसऱ्यांदा तेल गळती झाली असून गिरगाव सह मरीन ड्राईव्ह आणि वरळी सिफेस, बुधवार पार्क,कफ परेड येथील समुद्रातील पाण्यावर तेलाचे तवंग आले आहेत. तर गिरगाव चौपाटी वरील वाळूवर काळा रासायनिक थर जमा जमा झाला आहे.

समुद्रालगतच्या बऱ्याच भागात खारपुटी आणि तिवरांची रोपे आहेत. शिवाय पाण्यात विविध प्रकारची शेवाळ आणि प्रवाळ देखील आहेत. समुद्राच्या पाण्यात मिसळणारे रासायनिक द्रव्य तसेच तेलाच्या तवंगामुळे ही नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच मुंबई महानगर पालिकेने तात्काळ चौकशी करण्याची मागणी होत आहे.

"वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नैसर्गिक साधन सामग्रीसह रहीवाश्यांच्या आरोग्यास देखील धोका पोहोचू शकतो. यामुळे चौपाट्यांची तात्काळ साफसफाई करून अशा घटना रोखण्यासाठी तात्काळ पावलं उचलणे गरजेचे आहे."

-गॉडफ्राय पिमेंटा , तक्रारदार

"तेल गळतीच्या घटना वारंवार होत आहेत,यामुळे सर्व समुद्र किनारे काळवंडल्याचे दिसते. आम्ही याप्रकरणी तक्रार केली असून ठोस कारवाईची अपेक्षा आहे."

-प्रदीप पाताडे , समुद्री जीव अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT