BJP esakal
मुंबई

Mumbai BJP MP : मुंबईतील भाजपा खासदार लागले निवडणुकीच्या कामाला

भाजपाने निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरूवात केली असून भाजपा खासदार निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भाजपाने निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरूवात केली असून भाजपा खासदार निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मतदार संघातील अपूर्ण कामे पूर्ण करा, झपाट्याने विकास कामे करा असे आदेश खासदारांना दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची कामे लोकांपर्यंत पोचवा अशा सूचनाही केल्या आहेत.

खासदार गोपाळ शेट्टी आणि खासदार मनोज कोटक यांनी विकास कामे करण्यावर भर दिला आहे. विविध विकास प्राधिकरणे यांच्याशी संपर्क साधून, त्यांच्याशी समन्वय साधून कामाचा पाठपुरावा सुरू आहे. २०२४ पूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कामाचा धडाका लावला आहे. विशेषतः विकास कामांवर भर देण्यात येत आहे.

रस्त्याच्या कामावरही भर देण्यात येत आहेत. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या विक्रोळी, नाहूर आणि विद्याविहार या रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक येथील पुलांच्या गर्डरची कामे मार्गी लावली जात आहेत.

विकास कामे झपाट्याने कामे सुरू आहेत अशी माहिती ईशान्य मुंबईची खासदार मनोज कोटक यांनी दिली. मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलावा यासाठी खासदार काय करीत आहेत. त्याचा आऱाखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. बहुतेक खासदार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, निफ्टीही 23 हजारांखाली; कोणते शेअर्स घसरले?

Ashok Chavan Audio Clip : “थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा”; अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

पुण्यातील पेठांमध्ये राहणं शिक्षा, नागरिक पळून जातायत : विद्यानंद बापट

अमेरिकेत अश्विनी भावेंच्या घरी पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता, जंगी स्वागत, एकत्र जेवण अन्...

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT