mumbai sakal
मुंबई

Mumbai : भाजपा पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा; भाजपा पदाधिकाऱ्यांचा मानपाडा पोलिस ठाण्यावर मोर्चा

महिलेच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे. नंदू यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गुरुवारी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिसांचा निषेध नोंदवला.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली पूर्व भाजपा मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. यामुळे कल्याण डोंबिवलीतील भाजपाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी गुरुवारी मानपाडा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप केला.

यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपा शिष्टमंडळाने डोंबिवली सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल कुराडे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. याचा तपास सुरु असून सतत्या पडताळून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना दिले. डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांनी शारीरीक सुखाची मागणी तसेच खोली खाली करण्यासाठी धमकी दिल्याची तक्रार एका महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात दिली आहे.

महिलेच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे. नंदू यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गुरुवारी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिसांचा निषेध नोंदवला.

पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या निलंबनाची मागणी केली. शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.

भाजपा शिष्ठमंडळातील माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, गुलाबराव करंजुले, नंदू परब, संदिप माळी, रेखा चौधरी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या शिष्ठमंडळाने डोंबिवली सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल कुराडे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. यावेळी येथे मानपाडाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश बागडे, डोंबिवलीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर हे उपस्थित होते.

याबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, 'हा खोटा गुन्हा आहे. हा गुन्हा रद्द व्हावाच. मात्र तसेच मानपाडा पोलीस अधिकाऱ्यांकडून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जी वागणूक मिळते त्यात सुधारणा व्हायला हवी. तसंच, 'सरकार आमचं असलं तरी आम्ही सरकारविरोधात घोषणा दिलेल्या नाहीत. आम्ही आमचं म्हणणं मांडण्यासाठी आलो होतो. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल कुराडे म्हणाले, या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडून सुरू असून या गुन्ह्यातील सत्यता पडताळून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आम्ही भाजप शिष्टमंडळाला दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Why Grape Farmers Face Losses? द्राक्षबागेत पीकच न आल्याने शेतकऱ्याने झाडाला घेतला गळफास; साडेतीन ते चार एकरांत केली होती द्राक्ष शेती!

Hailstorm Damage: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! मध्यरात्री गारपिटीचा तडाखा; आंबा-संत्रा बागांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

SCROLL FOR NEXT