BMC
BMC sakal media
मुंबई

BMCच्या शिपायांची पत्नीच्या नावे कंपनी; लाटली कोट्यवधींची कामं

विराज भागवत

स्क्रू-ड्रायव्हर, ऑक्सिमीटरपासून ते कार भाड्याने देण्यापर्यंत सारं काही पुरवण्याचं कंत्राट

मुंबई: पालिकेतील अनेक कामांची कंत्राटे ही भ्रष्टाचारी मार्गाने दिली जातात असा आरोप कायम विरोधकांकडून केला जातो. त्यातच आता एक धक्कादायक गोष्ट उघड झाली आहे. पालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी म्हणजेच शिपाई पदावर काम करण्याऱ्या दोघांनी नियमबाह्यरित्या महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींची कंत्राटे मिळवल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर महापालिकेकडून या कर्मचाऱ्यांची आणि कंत्राट प्रक्रियेची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Mumbai BMC class four workers peons allegedly gave contract to company opened on wifes names)

नक्की काय घडलं? कसा उघड झाला प्रकार?

कोरोनाकाळात अनेक कंत्राट दिली होती. त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला जात असतानाच माहिती अधिकार कार्यकर्त्याने या संबंधीची माहिती मागवली होती. त्यामुळे माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब उघड झाली. महापालिकेच्या डी विभागातील दोन कामगारांनी आपल्या बायकोच्या नावाने कंपनी स्थापन करून पालिकेकडून कोरोना काळात कोट्यवधी रुपयांची कामे मिळवली. माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष दौंडकर यांच्यामुळे हे प्रकरण उजेडात आलं.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागात चतुर्थश्रेणी शिपाई असलेले अर्जुन नराळे आणि मेंटेनन्स विभागातील शिपाई पदावरचे रत्नेश भोसले यांनी आपल्या पत्नींच्या नावे कंपनी सुरु केली. अर्जुन नराळे याने पत्नी अपर्णाच्या नावे असलेल्या श्री एंटरप्रायजेस या कंपनीसाठी गेल्या दीड वर्षात एक कोटी ११ लाख रुपयांची कामे मिळवली. तर रत्नेश भोसलेच्या पत्नी रिया भोसले यांच्या आर आर एंटरप्रायजेस कंपनीला ६५ लाख रुपयांची कामे मिळाली.

मुंबई महापालिका अधिनियमानुसार, पालिकेत नोकरीला असलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाला पालिकेची अशी कंत्राटे घेता येत नाहीत. परंतु या दोघांनी मात्र नियम धाब्यावर बसवत स्वत:च्या पत्नींच्या नावे कंपनी उघडून कोट्यवधींची कामे मिळवली. पालिकेच्या डी विभागात कोरोना काळात कुठलीही वस्तू लागली तरी त्याचा पुरवठा करण्याचे काम या दोन कंपन्यांनी केलं. स्क्रू ड्रायव्हरपासून ते कॉम्प्युटरच्या छोट्या-मोठ्या पार्टपर्यंत आणि टेबलपासून भाड्याने गाड्या देण्यापर्यंत सर्व गोष्टींचा पुरवठा या दोन कंपन्यांनी केला. यात कोविड सेेंटरमधील रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिमीटर, इलेक्ट्रीक केटल, स्टीमर या वस्तुंचा पुरवठादेखील करण्यात आला.

दरम्यान, चतुर्थ श्रेणीतील दोन कामगार एवढे मोठे धाडस अधिकाऱ्यांशी साटंलोटं असल्याशिवाय करणं शक्य नाही, असा सूर पालिकेतील काही लोकांकडून आळवला जात आहे. त्यामुळे या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT