मुंबई

मुंबईत धुमाकूळ घालू शकतो कोरोना; १५ तारखेपर्यंत रुग्णांचा आकडा इतक्या हजारांवर जाऊ शकतो

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनामुळे मुंबईकरांची चिंता वाढताना पाहायला मिळतेय. अशातच आणखीन एक बातमी आता समोर येतेय. केंद्राच्या असेसमेंट टीमकडून १५ मे पर्यंत ७५ हजार कोरोना रुग्ण असतील अशी माहिती दिली आहे. या माहितीनुसार मुंबईकरांसाठी मे चा तिसरा आठवडा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशातच आता मुंबई महानगरपालिका देखील जोमाने कामाला लागलीये. मुंबई मगनगर पालिकेकेकडून ही परिस्थिती हाताळण्यासाठी ३ गोष्टींवर आता प्रामुख्याने लक्ष केंद्रीय केलं गेलंय. यामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ज्यांना लक्षण नाहीत अशा रुग्णांवर लक्ष ठेवणं आणि त्यांना उपचार पुरवणे आणि प्रायव्हेट आणि सरकारी कोविड रुग्णालयांची क्षमता वाढवणं यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.     

सध्या मुंबईत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर ७ दिवस एवढा आहे. या महिन्याच्या सुरवातीला हा दर ३.१ दिवस होता. भारतात कोरोना रुग्णाचा दर दुप्पट होण्याचा दर ९.१ दिवस आहे. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याच्या दरावर आधारित अभ्यासानुसार केंद्रीय आरोग्य विभागाकडून जे ठोकताळे मांडले गेलेत यामध्ये मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ७५००० पर्यंत जाण्याची शकते. धक्कादायक बाब म्हणजे यातील ६३००० रुग्णांमध्ये काहीही लक्षणं आधणार नाहीत तर केवळ १२००० रुग्णांमध्ये लक्षणं आढळून येतील असं देखील म्हटलंय.  

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचं :

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील रुग्णांचा आकडा दुप्पट होण्याची गती रोखणं. मुंबईत सध्या रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी सात दिवस लागतायत. हा आकडा ४ किंवा ५ दिवसांवर येऊ नये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. योग्य कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं तर रुग्णसंख्या कमी होऊ शकते.

तापाचे रुग्ण आणि वयस्कर नागरिकांची काळजी घेणं : 

मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन तपासणी केली जातेय. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि तपासण्याच्या माध्यमातून कोरोनाला आळा घालणं शक्य होऊ शकेल. यासमध्यामतून वयस्कर नागरिक आणि तापाच्या रुग्णाची देखील तपासणी करण्यावर महापालिकेचा फोकस आहे.  

देशातील ८० टक्के कोरोना रुग्णांना लक्षणं नाहीत : 

मुंबईत जवळ जवळ ८० टक्के कोरोना रुग्णांना कोरोनाची लक्षणं दिसत नाही. अशांसाठी मोठ्या प्रमाणात कोविड १९ रुग्णालयं आणि क्वारंटाईन सुविधा तयार करण्याची गरज आहे करणार. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हॉटेलमध्ये विना लक्षणं असणाऱ्यांसाठी २५ हजार बेड्सची सुविधा असल्याचं सांगितलंय.

mumbai corona count might go on 75000 by may mid 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: भारतीय संघाने मैदान मारलं, न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय मिळवला; इशान किशनच्या शतकानंतर अर्शदीपच्या ५ विकेट्स

Railway Toilet Incident Video : "गेट तोडा नाहीतर मी मरेन..." ; माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार अडकले रेल्वेच्या शौचालयात!

Manoj Jarange: रस्ता काट्यांना भरलेला, गिधाडांपासून सावध राहा, मनोज जरांगेंच्या सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला, काय म्हणाले?

Degloor Crime News : सीमेवरील हणेगावात ज्वेलर्सवर धाडसी दरोडा; साडेसात लाखाचा मुद्देमाल ताब्यात..

Terakhda News : वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे फटाका कारखान्यात स्फोट; मोठी आग,जीवितहानी टळली.

SCROLL FOR NEXT