मुंबई

मुंबईत एका दिवसात 11 मृत्युमुखी ;189 नवे रुग्ण; संख्या 1182 वर 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील कोरोनाबधितांमध्ये शनिवारी 189 रुग्णांची भर पडून एकूण संख्या 1182 झाली. आणखी 11 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा 75 वर गेला. आणखी दोन रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत 71 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

मुंबईत शनिवारी 189 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. निधन झालेल्या 11 रुग्णांपैकी 10 जणांना दीर्घकालीन आजार होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू 5 ते 9 एप्रिलदरम्यान झाल्याची माहिती देण्यात आली. महापालिका रुग्णालयांत आठ आणि खासगी रुग्णालयांत तीन कोरोनाबाधितंचा मृत्यू झाला. 

शनिवारी 293 संशयित कोरोना रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले; त्यामुळे संशयितांची संख्या 4328 झाली आहे. महापालिकेने 186 कोरोना केंद्रे आणि अति जोखमीच्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी दोन क्वारंटाईन सेंटर्स सुरू केली आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी 11 विशेष हेल्थ केअर सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. गंभीर रुग्णांसाठी व दीर्घकालीन आजार असलेल्यांसाठी 26 विशेष कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आली आहेत. 

2248 जणांची तपासणी : 

आतापर्यंत सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी 75 जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना आणि संशयितांच्या सर्वेक्षणातून 531 रुग्ण सापडले आहेत. प्रतिबंधात्मक क्षेत्रात संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी 60 विशेष दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. तेथे 2248 जणांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 861 संशयितांचे थ्रोट स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.

mumbai corona update 11 people lost life 189 new corona positive

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT