corona patients
corona patients  sakal media
मुंबई

दिवाळीत निर्बंध कठोर करण्याची शक्यता; मुंबईत कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर (corona second wave) रुग्णसंख्या नियंत्रणात आली होती. सण - उत्सवानंतर रुग्ण संख्या (corona patients increases) वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबईत होणारी गर्दी (mumbai crowd), लोकांचा बेजबाबदारपणा (people irresponsibility) याला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे ऐन दिवाळीत (diwali festival) कोरोना नियमावली (corona rules) कठोर होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेने कोरोनाची दुसरी लाट थोपली आहे तर तिसरी लाट येऊच नये म्हणून पालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यात लसीकरनालाही वेग दिला आहे असे असताना पून्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. साधारण सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यानंतर रुग्णसंख्येत वाढ दिसत आहे. मुंबईत निर्बंधांमध्ये आणलेली शिथिलता मुळे लोक बिनधास्त झाल्याचे दिसत आहे.मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी, मास्क न वापरणे असे प्रकार समोर येत आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एका व्यक्तीकडून इतरांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढला असून, मुंबईतकोरोनाची आर व्हॅल्यू पुन्हा एकदा 1 हून अधिक झाली आहे.आर व्हॅल्यू अर्थात रिप्रोडक्शन व्हॅल्यूमध्ये झालेली वाढ कोरोनाचा धोका अधिक वाढवून जात आहे. ज्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.तर सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा गर्दी होत आहे.लोकल मध्ये ही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे यामुळे कोरोना फोफावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महापालिकेकडून मुंबईकराना कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले जात आहे मात्र असे असून अनेक जण हे नियम धाब्यावर बसवत आहेत. जर हीच परिस्थती राहिली तर ऐन दिवाळीच्या सणात मुंबईत कोरोना प्रतिबंधीत नियम कठोर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

"मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मात्र इतक्यात तिसरी लाट आली असे म्हणता येणार नाही. पुढील महिनाभर रुग्णसंख्येवर लक्ष ठेवले जाईल,त्यानंतर नवीन नियमावली किंवा तिसऱ्या लाटे बाबत निश्चित सांगता येईल. "

-सुरेश काकाणी , अतिरिक्त आयुक्त , महानगरपालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur Lok Sabha: '500 रुपये एका मताची किंमत'; अमोल कोल्हेंनी व्हिडिओ शेअर करत केला मोठा दावा

Mamata Banerjee: ममतांनी सांगितलं NDA अन् INDIAला किती जागा मिळणार; म्हणाल्या, कालच...

Rohit Sharma: फक्त रोहितचाच जलवा! सर्वात मोठ्या स्टेडियमवर टीम इंडियाची T20 जर्सी लाँच, पण हार्दिककडे दुर्लक्ष, पाहा Video

Maharashtra Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

Mumbai Rain Accident: घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले, जवळपास 80 गाड्या दबल्या, अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT