hotspot 
मुंबई

हॉटस्पॉटचे निकष बदलले; कोणते आहेत मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट

सकाळवृत्तसेवा

मुंबई ः मुंबईतील कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरलेल्या अतिगंभीर क्षेत्राची संख्या कमी झाली असून ती सातवरुन पाच करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने हॉटस्पॉटचे निकष बदलल्याने हॉटस्पॉटची संख्या कमी झाली आहे. नव्या निकषानुसार हॉटस्पॉटची संख्या 7 वरून 5 वर झाली आहे. तर, गंभीर स्थिती असलेल्या विभागांची संख्या 8 वर गेली आहे. 

या पूर्वी 50 च्यावर रुग्ण असलेला विभाग अतिगंभीर विभाग समजला जात होता. आता मात्र  रूग्णांची संख्या 85 च्या वर गेल्यास तो विभाग अतिगंभीर समजला जाईल. तसेच पूर्वी ३० ते ५० रूग्णसंख्या असलेल्या विभागास गंभीर समजले जात होते. पण आता 50 ते 84 असा नवा निकष लागू केला आहे. 
 
मुंबईतील हॉटस्पॉट असलेला परिसर आणि रुग्णसंख्या

  • जी साऊथ -  वरळी, प्रभादेवी, लोअर परळ - अतिगंभीर - 360
  • ई वॉर्ड - भायखळा,  भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग - अतिगंभीर -135
  • डी वॉर्ड - नाना चौक ते मलबार हिल परिसर - अतिगंभीर - 130
  • एम ईस्ट - गोवंडी, मानखुर्द परिसर - अतिगंभीर -  95
  • एच इस्ट - वांद्रे पूर्व भाग, वाकोला परिसर, कलानगर ते सांताक्रुझ - अतिगंभीर  -  96

पालिकेकडून दररोज कोरोना रुग्णांची आकडेवारी दर्शवणारा एक आराखडा दिला जातो. त्यात निळ्या रंगात कोरोना हॉटस्पॉट दर्शवले जातात. त्यानुसार, निळ्या रंगात असणारी माहिती कमी दाखवण्यात आली आहे. त्यानुसार, हे हॉटस्पॉट 7 वरुन  5 करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT