sherlyn chopra sakal media
मुंबई

अभिनेत्री शर्लिन चोप्राला बजावले समन्स, 'या' दिवशी होणार चौकशी

अनिष पाटील

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography case) नवीन पुरावे हाती लागल्यामुळे गुन्हे शाखा (Crime Branch) याप्रकरणाशी संबंधीत व्यक्तींची पुन्हा चौकशी करत आहे. याप्रकरणी आता गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अभिनेत्री शर्लिन चोप्राला ( Sherlyn Chopra) समन्स पाठवून (Summons) मंगळवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी सांगितले आहे. यापूर्वी रविवारी अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. पण ती उपस्थित राहिली नाही. (Mumbai Crime Branch sends summons to sherlyn chopra in pornography case-nss91)

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या अटकेनंतर गुन्हे शाखेच्या हाती नवे पुरावे लागले आहेत. त्यामुळे पोलिसानी आता पुन्हा अनेकांची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. आता राज कुंद्रा प्रकरणी गुन्हे शाखा शर्लिन चोप्राची चौकशी करणार असून तिला समन्स पाठवण्यात आले आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर तिने ट्वीटरवर व्हिडिओ अपलोड केला होता. त्यावेळी तिने यापूर्वी महाराष्ट्र सायबर विभागाने केलेल्या चौकशीत तिने याबाबतची माहिती दिली होती, असा दावा केला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लीलतेप्रकरणी दाखल गुन्ह्यात मार्च महिन्यात महाराष्ट सायबर विभागाने शर्लिनचा जबाब नोदवला होता.

रविवारी तन्वीरसह आणखी एका व्यक्तीचा जबाब गुन्हे शाखेने नोंदवला होता. याशिवाय गहना वशिष्ठचाही जबाब नोंदवण्यात येणार होता. पण गहनाचा जबाब झाला नसल्याचे गुन्हे शाखेतील सुत्रांनी सांगितले. याप्रकरणी आता विआन इंडस्ट्रीजच्या चार कर्मचा-यांना साक्षीदार करण्यात येणार असल्याचीही माहिती समजली आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टीच्या पतीला गुन्हे शाखेने अटक केली होती. कुंद्राने अश्लील चित्रफीत प्रसारीत करणारे हॉटशॉट हे अॅप्लिकेशन प्ररदीप बक्क्षीला विकल्याचा दावा केला होता.

बक्क्षी हा राज कुंद्राचा नातेवाईक आहे. पुढे तपासात व्हॉट्सअॅप संदेशांद्वारे कुंद्रा नियमीत या अॅप्लिकेशनच्या व्यवहारांची माहिती घेत होता, असे स्पष्ट झाले. त्यासाठी त्याने व्हॉट्सअॅप ग्रुपही बनावला होता. कुंद्राच्या वतीने गहना व कामत दोघे निर्माता व दिग्दर्शक होते. त्यांच्या पटकथाही लिहीत होते. या पटकथांचे ईमेल पाठण्यात आले आहेत. त्यात सीसी म्हणून कुंद्रालाही ईमेल पाठवण्यात आले आहेत.

तसेच कुंद्राकडून नियमीत पैशांची चर्चा होत होती. त्याने या व्यवसायात 10 कोटी रुपये गुंतवले होते. कामतच्या अटकेनंतर कुंद्राचे या व्यवसायातील आर्थिक व्यवहार उघड झाले. त्यामुळे कुंद्राला अटक करण्यात आली. कुंद्राने अटक आरोपी रायन थॉर्पच्या मार्गदर्शनाखाली दोघांना विआन इंडस्ट्रीजच्या पगारावर हॉटशॉट अॅप्लिकशन हाताळण्यासाठी ठेवले होते. विआन इंडस्ट्रीज दरमहा अॅप्लिकेशनसाठी दोन ते तीन लाख रुपये देत होती. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून त्यातील 9 जणांविरोधात गुन्हे शाखेने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

बँक खाती गोठवली

राजकुंद्राच्या अटकेनंतर कुंद्रासह कानपूर येथील महिलेचे खाते पोलिसांनी गोठवले आहे. पॉर्नोग्राफीप्रकरणातील कोट्यावधींची रक्कम या खात्यात जमा झाल्याचा आरोप आहे. हे बँक खाते हर्षिता श्रीवास्तव नावाच्या महिलेचे आहे. हे बँक खातं जेव्हा सील करण्यात आलं तेव्हा देखील त्या खात्यात 2 कोटी 32 लाख 45 हजार रुपये होते. हॉटशॉट्सच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अरविंद कुमार नावाचा एक व्यक्ती आहे. या अरविंदच्या पत्नीचं नावच हर्षिता असं आहे. अरविंद हा फक्त त्याच्या पत्नीच्याच नव्हे तर त्याच्या वडिलांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करायचा.

अरविंद अ‍ॅपमधून कमावलेले पैसे आपल्या कुटुंबियांच्या बँक खात्यात का ट्रान्सफर करायचा, याबाबत सध्या तपास सुरु आहे. संबंधित बँक खात्यांचा उपयोग हा सट्टेबाजी किंवा ब्लॅकमनीचा पैसा वळवण्यासाठी करण्यात आल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. हर्षदा आणि नर्वदा यांच्या बँक खात्यात पैसे आल्यानंतर काही दिवसांनी ते पैसे वेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले जायचे. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर आता अरविंदचं बँक अकराउंटदेखील सील करण्यात आलं आहे. या खात्यात तब्बल 1.81 कोटी रुपये होते. याशिवाय वडिलांच्या खात्यात पाच लाख 59 हजार रुपये जमा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT