मुंबई

निर्दयी आई!, बाळंतीण होताच स्वयंपाकघरातून फेकलं नवजात बालकाला

पूजा विचारे

मुंबईः घाटकोपरमधील पंतनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २५ वर्षीय महिलेला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. नवजात बालकाला सहाव्या मजल्यावरुन फेकून दिल्याचा आरोप या महिलेवर आहे. आरोपी सध्या राजावाडी रुग्णालयात आहे. ४ ऑगस्टला घाटकोपर पूर्व येथील शंकर वाडी येथे दोन इमारतींच्या मधल्या भागात चार एक नवजात बाळ पडलेलं एका रहिवाशानं पाहिलं. त्यानंतर या रहिवाशानं तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. परिसरातील शेकडो रहिवाशांनी चौकशी केल्यानंतर पोलिसांना या नवजात बालकाच्या आईला शोधण्यात यश आलं.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सुहास कांबळे आणि निरीक्षक रेणुका बुवा घटनास्थळावर गेले होते. तेव्हा आढळून आलं की, ती केवळ एक दिवसाची मुलगी होती. ही मुलगी दोन इमारतींच्या मधल्या भागात आढळून आली, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक कांबळे यांनी दिली.

कोविड १९ मुळे बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं नाही. कोरोनामुळे लोकांशी बोलणं एक मोठी समस्या होती. आम्ही परिसरातील प्रत्येक महिलेशी बोलून बाळाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, असं दुसऱ्या अधिकाऱ्यानं सांगितलं. तब्बल चार तास तपास केल्यानंतर पोलिसांना बाळाच्या आईचा शोध लागला. 

शेवटी, आम्ही ज्या घरातून बाळाला फेकलं त्या घरात पोहोचलो.  त्या महिलेच्या कुटुंबाला महिला गर्भवती होती हे माहित होतं. मात्र कुटुंब या प्रकरणात सामील होऊ इच्छित नव्हते. घरी प्रसूती झाल्यामुळे तिला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले जेथे तिच्यावर सध्या उपचार सुरु असल्याचं, डीसीपी (झोन ७ ) प्रशांत कदम यांनी सांगितलं. 

पोलिस सुत्रांनी सांगितले की, ही महिला दोन वर्षांपासून बेरोजगार आहे. ती तिच्या आईवडिलांसह आणि भावासोबत राहते. हे बाळ कोणाचं आहे हे तिच्या कुटुंबियांना माहित नव्हतं. तसंच तिनं मुलं कोणाचं आहे त्या व्यक्तिचं नाव देखील सांगण्यास तयार नव्हती. त्या कुटुंबियांनी या बाळासाठी काही करण्यास नकार दिला. 

पोलिसांनी सांगितले की, ४ ऑगस्ट रोजी महिलेने बाळाला जन्म दिला, नाभीसंबधीचा दोर कापला आणि बाळाला स्वयंपाकघरातील खिडकीतून खाली फेकले. दरम्यान पोलिसांनी या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Mumbai Crime Ghatkopar Mother Flings Her Newborn Girl 6th Floor

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT