मुंबई

काढली सिगारेट शिलगावण्यासाठीची पिस्तूल, रोखली दुकानदारावर आणि मोबाईल घेऊन झाला भुर्रर्र

सुमित बागुल

मुंबई, ता. 30 : सिगारेट शिलगावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिस्तुलाच्या आकारातील लायटरचा वापर करून एकाने दुकानातून 85 हजार रुपयांचा मोबाईल चोरी केल्याची घटना अंधेरीत घडली. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी एका व्यायाम प्रशिक्षकाला अटक केली आहे.

23 वर्षीय दानिश जमिल खान असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दानिशचे वडील चित्रपट सहदिग्दर्शक म्हणून काम करतात. गेले अनेक दिवस दानिश आयफोन वापरत होता. तो जुना झाल्याने आणि तितक्‍याच किमतीचा मोबाईल विकत घेणे परवडणारे नसल्याने त्याने काही तरी शक्कल लढवण्याचे ठरवले. यासाठी त्याने घरात ठेवलेल्या पिस्तुलाच्या आकारातील लायटर उचलले आणि तो मोबाईलच्या दुकानात शिरला. 

मोबाईल खरेदीच्या बहाण्याने गुरुवारी सायंकाळी महागड्या मोबाईलच्या दुकानात शिरला. त्यानंतर काही क्षणांत त्याने दुकानदारावर बनावट पिस्तुल रोखले. या साऱ्या प्रकाराने दुकानदार आधी भयभीत झाला. तसे दानिशने त्याच्याकडे महागड्या मोबाईलची मागणी केली. त्यावर दुकानदाराने मोबाईल दानिशच्या हाती सोपविला. तो घेऊन दानिशने तेथून पळ काढला. 

या सगळ्या प्रकारानंतर दुकानदाराने तातडीने ओशिवरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ओशिवरा पोलिसांनी दानिशला अटक केली. या प्रकरणी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

mumbai crime news 23 years oid danish arrested for stealing from andheri mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT