मुंबई

पैशाच्या पाऊस चांगलाच अंगलट; भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे वृध्द महिलेला शॉक

अनिश पाटील

मुंबई, ता. 21 : पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली नागपाड्यातील 82 वर्षीय वृद्ध महिलेची भोंदूबाबाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भोंदू बाबाकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. मात्र ज्यावेळी वृद्धाकडचे सगळे पैसे आणि दागिने संपले त्यावेळी तिने मुलींकडे पैशांची मागणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

नागपाडा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 82 वर्षीय वृद्ध महिलेची 2019 मध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर या भामट्यांनी वयोवृद्ध महिलेला पैशांचे आमीष दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं. मागील दोन वर्षांपासून या भोंदू बाबांनी वेळोवेळी फसवणूक करत होते.

तीस वर्षीय हनिफ मोहम्मद शेख, अठ्ठावीस वर्षीय इम्रान मोहम्मद सय्यद असं या भोंदूबाबांची नावे आहेत. हे दोघेही मालाडच्या मालवणी परिसरातली राहणारे आहेत. भोंदूबाबानं वारंवार महिलेकडून पैसे आणि दागिन्यांची मागणी करत पैशांचा पाऊस पाडून देतो असं आमिष दाखवलं होतं. पैशांचा पाऊस पाहण्याच्या नादात त्या महिलेने तिच्याकडेचे सगळे दागिने विकून पैसा जमा केला आणि ते पैसे या भोंदू बाबाला देऊ केले.

मात्र पैशाची भूक न मिटलेल्या या भोंदूबाबाकडून वारंवार पैशांची मागणी होतच होती. गेल्या दोन वर्षात या भोंदूबाबाने या वृद्ध महिलेकडून तब्बल 39 लाखांचा मुद्देमाल घेतल्याचं तपासामध्ये उघडकीस आले आहे.

आरोपी भोंदूबाबने या महिलेला तिच्यात घरात अंधार करून, मंत्र तंत्राचा वापर करून, खोट्या नोटांचा पाऊस पाडून दाखवला होता. तसेच त्या खोट्या नोटा तिच्याच कपाटात ठेवून त्याची माहिती कुणाला न देण्याचे सांगितले. तसे केल्यास तिचे नुकसान होईल, तिच्या मुलींच्या आयुष्यात अनेक विघ्न येतील अशी भिती दाखवली होती.

महिलेकडचे सर्व पैसे संपल्यानंतरही आणखी पैसे हवे असल्यास 5 लाख द्यावे लागतील, अशी मागणी केली होती. मात्र वेळीच पीडित महिलेच्या मुलीने या सगळ्याची माहिती घेतली असता पैशांचा पाऊस म्हणून पाडलेल्या नोटा लहान मुलांच्या खेळण्यातील असल्याचं समोर आल्याने या भोंदूबाबाचा भांडाफोड झाला आहे.

mumbai crime news man duped old women of nagpada by giving fake promise of rain of money

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT