मुंबई

जबरदस्त ! कोणताही पुरावा नसताना, अवघ्या एका तासात मुंबई पोलिसांनी सोडवली केस

अनिश पाटील

मुंबई  : मालाड परिसरात पालिकेचे अधिकारी असल्याचे सांगून दोघांनी 13 वर्षीय मुलाचे अपहण केले. त्या मुलाला निर्जनस्थळी नेऊन आरोपींनी मुलाच्या बापाकडे चक्क 10 लाखांची खंडणी मागितली. घाबरलेल्या मुलाच्या बापाने पोलिसांची मदत घेतल्यानंतर मालाड पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपींना शोधून काढत अटक केली आहे. 

मालाड पोलिसांच्या परिसरातून 13 वर्षाचा अल्पवयीन मुलगा जात होता. त्यावेळी तोंडाला मास्त नसल्याचे कारण सांगत आरोपींना त्याची वाट अडवली. त्यावेळी दोघा आरोपींनी स्वतःची ओळख ही पालिका कर्मचारी असल्याचे सांगितले. दोघांनी कारवाई करण्याच्या नावाखाली मुलाला कांदिवली लिंक रोड परिसरातील एका निर्जनस्थळी नेले. त्यावेळी मुलाला दोघांनी जिवे ठार मारण्याची भिती घातली. तसेच मुलाकडून त्याच्या वडिलांचा नंबर घेत आरोपींनी मुलाच्या वडिलांना फोन केला. तसेच मुलाच्या सुटकेसाठी आरोपींनी मुलाच्या वडिलांकडे 10 लाख रुपये खंडणी मागितली. 

मुलाचे अपहण झाल्याचे समजताच त्याच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यावेळी मुलाच्या बापाने मालाड पोलिसात धाव घेत पोलिसांकडे मदत मागितली. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलिस कामाला लागले. कोणताही पुरावा नसताना अवघ्या एका तासात गुन्हा सोडवून आरोपींना अटक केली. या मुलाचा ताबा पोलिसांनी त्याच्यापालकांना दिला आहे. या आरोपींवर मालाड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

mumbai crime news police solved kidnapping case within one hour

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT