kalyan station traffic kalyan
मुंबई

Mumbai Crime : रिक्षा भाडे कमी घेतले म्हणून रिक्षाचालकाला मारहाण ; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Crime : महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

शर्मिला वाळुंज

Mumbai Crime : कल्याण डोंबिवलीतील रिक्षाचालकांची मुजोरी, दादागिरी सर्वांनाच माहित आहे. रिक्षाचालकांच्या मनमानी भाडेवाढीला आरटीओ प्रशासन चाप लावू शकलेले नाही, त्यातच काही रिक्षा चालक नियमानुसार भाडे आकारतात. मात्र त्यांना इतर मुजोर रिक्षाचालकांच्या दादागिरीला सामोरे जावे लागते. अशीच एक घटना कल्याण स्थानक परिसरात घडली आहे.

प्रवाशांकडून कमी भाडे आकारले म्हणून चौघांनी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. लांबचे भाडे नाकारणे, उद्धट वर्तन, जादा भाडे आकारणे यांसारखे प्रकार करत प्रवाशांना नाहक त्रास रिक्षाचालक देत असतात. प्रवाशांना त्रास दिला जातोच शिवाय नियमानुसार भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांना देखील हे मुजोर रिक्षाचालक सोडत नाहीत.

याचेच उदाहरण म्हणजे कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात शनिवारी पहाटे घडलेली घटना. फिर्यादी रिक्षाचालक अशफाक शेख हे कमी भाड्यात कल्याणहून भिवंडी येथे प्रवासी वाहतूक घेऊन जात होते. याचा राग अरमान शेख, अरबाज शेख, रमेश गुप्ता आणि अफजल खान यांना आला. त्यांनी आपआपसात संगनमत करत अशफाकला मारहाण केली.

स्टीलच्या रॉडने अशफाकच्या हातावर आणि डोक्यावर वार करत बेदम मारहाण करण्यात आले. तसेच कल्याण मध्ये धंदा कसा करतो, भाडे कसे मिळवतो, तुला सोडणार नाही अशा धमक्या देण्यात आल्या.

यानंतर फिर्यादी शेख यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन मारहाण प्रकरणी चौघांविरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. काही रिक्षाचालकांच्या या मुजोरी मुळे प्रामाणिक काम करणाऱ्या रिक्षाचालकांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे.

अव्वाच्या सव्वा भाडे आकारून हे रिक्षाचालक ग्राहकांना वेठीस धरतात. आधी च रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात इमानदारीने धंदा करणाऱ्या अशा रिक्षाचालकांना अशा प्रकारे मारहाण होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

SCROLL FOR NEXT