csmt 
मुंबई

CSMT स्टेशनचं रूपडं पालटणार; पुनर्विकासासाठी 9 कंपन्या पात्र

कुलदीप घायवट

स्थानक, रेल्वे परिसराचा पुनर्विकास करण्यासाठी 1 हजार 642 कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई: जागतिक वारसा असलेली आणि मध्य रेल्वेचे (Central Railway) मुख्यालय असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) हेरिटेज इमारतीला नवीन झळाळी देण्यात येणार आहे. हेरिटेज इमारतीचा (Heritage Building) पुनर्विकास केला जाणार असून यासाठी 9 कंपन्या (9 Company Tenders) पात्र ठरल्या आहेत. स्थानक आणि रेल्वे परिसराचा पुनर्विकास (Redevelopment) करण्यासाठी 1 हजार 642 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. (Mumbai CSMT Railway Station Redevelopment Project 9 tenders short listed)

मुंबई विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानक करण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांना विमानतळाप्रमाणे सोयी-सुविधा पुरविण्यासाठी स्थानकाच्या पुनर्विकासाची योजना आखली आहे. भारतीय रेल्वे स्टेशन विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (IRSDC) यांच्या वतीने CSMT स्थानकाचा पुनर्विकास आणि आयकाॅनिक सिटी सेंटरमध्ये रुपांतरित करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी मूल्यांकन समिती (PPPAC) यांच्या मान्यतेला मंजूरी मिळाली.

या आहेत ९ कंपन्या...

ऑगस्ट 2020 मध्ये खासगी कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले. तर, 15 जानेवारी 2021 रोजी CSMT च्या पुनर्विकासाच्या कामाला एकूण 10 खासगी कंपन्यांनी प्रतिसाद दिला. यापैकी 9 कंपन्या पात्र ठरल्या आहेत. यामध्ये मेसर्स गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड, मेसर्स एकोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट्स होल्डिंग्स लिमिटेड, मेसर्स ओबेरॉय रियल्टी लिमिटेड, मेसर्स आयएसक्यू आशिया इफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स अदानी रेल्वे ट्रान्सपोर्ट लिमिटेड, मेसर्स कल्पतरु पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड, मेसर्स जीएमआर इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स मोरीबस होल्डिंग्स पीटीई लिमिटेड आणि मेसर्स बीआयएफ-IV इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग डीआईएफसी प्रायव्हेट यांचा सहभाग आहे.

विमानतळाच्या धर्तीवर या स्थानकात सर्व सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. या स्थानकाला मुंबईच्या मध्यवर्ती रेल्वे मॉल प्रमाणे विकसित केले जाणार आहे. 2.54 लाख चौरस मीटरचा जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी गॅलरी, बसण्याची जागा, कॅफेटेरिया, वाहन तळाची जागा निर्माण करण्यात येणार, लांब पल्ल्याच्या गाड्यांचं तिकीट केंद्र स्थलांतरीत करून इमारतीचा काही भाग पाडला जाणार आहे. त्याऐवजी समोरील CSMT स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलरी उभारली जाणार आहे.

CSMT हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे. पुनर्विकास करताना CSMT परिसरात रेल मॉलही उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये खरेदीसह मनोरंजनाचीही साधने असतील. ज्या कंपनीबरोबर यासंदर्भातील करार केला जाईल, त्या कंपनीला या रेल्वे स्थानकावरील उद्योगांसंदर्भातील देखरेख आणि इतर (कर्मर्शियल) कारभार 60 वर्षांसाठी भाडेपट्टीवर दिला जाईल. पुनर्विकास प्रकल्प खर्च 1 हजार 642 कोटी रुपये अपेक्षित आहे.

CSMT स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे. फलाट क्रमांक 18 मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफे टेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे. सुविधांकरीता आकारण्यात येणारे सेवाशुल्क हे प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे. स्थानकातील रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल, प्रसाधनगृह व इतर सुविधा या खासगी विकासकाच्या अखत्यारितच राहणार आहेत.

देशात 123 स्थानकाचा पुनर्विकास

रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकारद्वारे भारतीय रेल्वे मार्गावरील स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. यासाठी पीपीपी योजना लागू केली आहे. या अंतर्गत आयआरएसडीसी 63 आणि आरएलडीए 60 स्थानकांवर काम सुरू आहे. एकूण 123 स्थानकाचे पुनर्विकास करण्याच्या कामाला सुरूवात केली असून यासाठी सुमारे 50 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Election : कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना महायुतीची एकतर्फी लढत; पॅनल 30 मध्ये ठाकरे गटाचा शिंदे सेनेला बिनशर्त पाठिंबा!

Badlapur MIDC Explosion: बदलापूर 'MIDC' हादरली! केमिकल कंपनीत तासभरातच एकामागोमाग पाच ते सहा भीषण स्फोट

Nitish Kumar Hijab Controversy: नितीश कुमारांच्या ‘हिजाब’ प्रकरणातील 'ती' डॉक्टर तरूणी अखेर सरकारी नोकरीत झाली रुजू

Shakun Shastra : डोळे फडफडणे, तळहात खाजवणे, अंग थरथरणे शुभ की अशुभ? शकुन शास्त्रातील रहस्य काय सांगते पाहा..

Akola Political : अखेर ‘अकोट विकास मंचा’तून ‘एआयएमआयएम’ बाहेर; अकोटमध्ये सत्तेचा नवा खेळ सुरू!

SCROLL FOR NEXT