ST Worker Strike sakal media
मुंबई

मुंबईत जमावबंदी लागू; एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवलं!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमाव बंदी लागू

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत (Mumbai News) वाढत्या कोरोना आणि ओमिक्रॉन संसर्गाच्या (Corona and Omicron infections) पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळं आझाद मैदानात (Aazad Maidan) आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee) पोलिसांनी बाहेर काढलं आहे. असं असलं तरी एसटी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळं त्यांना केवळ सकाळी ५ ते संध्याकाळी ५ या वेळेत आंदोलन करता येणार आहे.

राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं निर्बंध वाढवले आहेत. सध्या नव्या नियमावलीनुसार, शुक्रवार ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबईत जमावबंदीचं १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. त्यामुळं आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मैदान सोडण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. आंदोलकही पोलिसांच्या या सूचनांचे पालन करत आंदोलनस्थळावरुन बाहेर पडले आहेत.

एसटी कर्मचारी सुमारे महिन्यापासून विविध मागण्यासांठी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या मागण्यांपैकी त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या राज्य शासनानं मान्य केल्या असल्या तरी कर्मचारी आता एसटीच्या विलिकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT