gosht paishapanyachi book esakal
मुंबई

Mumbai : ‘गोष्ट पैशापाण्याची’ पुस्तकाची विक्रमी विक्री

उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचे पुस्तक ‘सकाळ प्रकाशन’तर्फे प्रकाशित

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रकाशनापूर्वीच विक्रमी विक्रीमुळे गाजलेल्या ‘गोष्ट पैशापाण्याची’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (ता. ९) वाचकांच्या प्रचंड गर्दीत उत्साहात झाला. उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचे हे पुस्तक ‘सकाळ प्रकाशन’तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, राज्याचे माजी महसूलमंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, लेखक-दिग्दर्शक अरविंद जगताप, ‘एबीपी न्यूज’चे मुख्य संपादक राजीव खांडेकर आदींच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. दादर प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या प्रकाशन सोहळ्यासाठी राज्यभरातून रसिक आले होते.

रात्री साडेदहापर्यंत संपूर्ण भरलेल्या या सोहळ्यात पैसा कसा कमवावा याच्या टीपा होत्या, पैशाबरोबच माणसे जोडा हा संदेश होता, त्यानुसार केलेली समाजसेवी कृती होती, जोडलेल्या माणसांना दंडवत घालून लेखकाने मानलेले आभार होते, पुष्पगुच्छाऐवजी मान्यवरांना दिलेली विचारपुष्परुपी ग्रंथभेट होती आणि राजकीय विनोदी टोलेबाजीही होती. ‘प्रामाणिकपणे श्रीमंत व्हायला लाजू नका’, असे सांगतानाच प्रफुल्ल वानखेडे यांनी पैशाबरोबरच आयुष्यात माणसे जोडेपर्यंत माणूस म्हणून तुम्हाला किंमत नाही, असे सांगून दातृत्वाचे प्रत्यक्ष उदाहरण दिले.

प्रसिद्धी आणि स्नेही वाचकांचे प्रेम कमावलेल्या वानखेडे यांनी वाचकांच्या व स्नेह्यांच्या आयुष्यभर ऋणात राहू असे सांगितले. कार्यक्रम संपल्यानंतरही वानखेडे यांना भेटण्यासाठी वाचकप्रेमी आवर्जून थांबले होते. प्रवेशद्वाराशी या पुस्तकाची काढलेली हुबेहूब रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छाऐवजी पुस्तकांच्या संचाची ग्रंथभेट देण्यात आली.

श्रोत्यांकडून टाळ्यांचा गजर

कोलगेट, पार्ले, मर्सिडीज, वेदांत, एल ॲण्ड टी अशा भारतातील जवळपास सर्वच कंपन्यांची ‘हिटिंग सिस्टीम’ आम्ही बनवतो. हे काम करणारी ही भारतातील एकमेव कंपनी आहे, असेही वानखेडे यांनी अभिमानाने सांगितले. त्यावर या कंपन्या जरी मराठी माणसाच्या नसल्या तरीही त्या मराठी माणसाच्या मनगटाच्या जोरावर चालतात असे थेट ब्रँडिंग आपण करू या, असे ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक राहुल गडपाले यांनी सांगताच श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मदतीचे औदार्य

समाजाला वाचनाची सवय लावण्याचा सतत विचार करणाऱ्या ‘लेट्स रीड इंडिया’ चळवळीचे वानखेडे हे संस्थापक आहेत. त्यांनी या समारंभात, वाचन चळवळीचे काम करणाऱ्या अन्य संस्थांना मदत करण्याचे औदार्यही दाखवले. या पुस्तकविक्रीच्या नफ्यातून मिळालेली रक्कम ‘ज्ञान की संस्था’ आणि ‘वॉवेल्स ऑफ पीपल्स असोसिएशन’ या संस्थांना त्यांनी दिली.

वाचकांकडूनच लेखनस्फूर्ती

आपण उद्योजक व्हायचे हे पहिल्यापासूनच ठरवले होते, आपण ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे पैसे कमावतो ते महत्त्वाचे असते, असे सांगतानाच प्रफुल्ल वानखेडे यांनी आपल्या वडिलांच्या प्रामाणिकपणाचीही उदाहरणे दिली. वडिलांनी आपल्यात वाचनप्रेम रुजवल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. या समारंभाला आलेल्या आणि ऑनलाइन कार्यक्रम पाहणाऱ्या वाचकांकडूनच आपल्याला लेखनाची स्फूर्ती मिळते, असे सांगून त्यांनी या वाचकांना प्रणाम केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT