मुंबई

मुंबई लस घोटाळा: मुख्य आरोपी राजेश पांडेला बारामतीतून अटक

बोगस लसीकरणाच्या सर्व गुन्ह्यात पांडेचा सहभाग.

सुरज सावंत

मुंबई: कांदिवलीसह मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बोगस लसीकरण घोटाळ्यातील (Mumbai fake vaccination scam) मुख्य आरोपी राजेश पांडेला (rajesh pande) अटक करण्यात आली आहे. राजेश पांडे याला बारामती (baramati) परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. बोगस लसीकरण प्रकरणात नोंदवण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यात पांडेचा सहभाग होता. (Mumbai fake vaccination scam main accused rajesh pande arrest from baramati area)

मागील अनेक दिवसांपासून पांडेच्या मागावर मुंबई पोलिस होते. अखेर पांडेला बारामती परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बनावट लस घोटाळ्यात राजेश पांडेचे नाव आरोपी म्हणून पहिल्यांदा समोर आले होते. मुंबईतील एका प्रतिष्ठीत रुग्णालयात राजेश पांडे नोकरीला होता.

राजेश पांडे लसीकरणासाठी संपर्क साधायचा. प्रतिष्ठीत रुग्णालयात काम करत असल्याने ती ओळख वापरुन तो विश्वास संपादन करायचा. आरोपी राजेशचे नाव प्रतिष्ठीत रुग्णालयाशी जोडलेले असल्याने लोकही त्याच्यावर डोळेझाकून विश्वास ठेवायचे. मुंबई पोलिसांनी राजेश पांडेला सुरुवातीला कांदिवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी पोलिसांकडे राजेश विरोधात ठोस पुरावे नव्हते.

मागच्या काही दिवसांपासून तो फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. मंगळवारी डॉ. मनिष त्रिपाठी या आरोपीने सुद्धा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. डॉ. मनिष त्रिपाठीचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यानंतर तो पोलिसांना शरण आला. मुंबई पोलिसांनी या बोगस लसीकरण घोटाळ्यात आतापर्यंत सात एफआयआर नोंदवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT