मुंबई, 05: कर्करोगाच्या अचूक उपचारांसाठी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट प्रोटॉन बीम थेरेपी मशीन आणण्याची योजना पालिकेकडून आखली जात आहे. पालिकेकडून याबाबत आपल्या अर्थसंकल्पात माहिती देण्यात आली होती. पालिकेच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, हे मशीन पालिकेच्या कोणत्यातरी एका प्रमुख रुग्णालयात ठेवले जाईल किवा पालिकेच्याच वडाळा येथील एकवर्थ रुग्णालयात ठेवले जाईल.
सध्या तरी ही योजना प्राथमिक स्वरुपात आहे, मात्र, पालिका प्रशासन या प्रकल्पाबाबत खूप सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. पालिकेने प्रोटॉन थेरपीसाठी रुग्णालय बांधण्यासाठी अर्थसंकल्पात 2 कोटींचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, प्रोटॉन थेरेपीच्या सहाय्याने रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार करता येतील. हे तंत्रज्ञान खूपच महाग आहे, अशा परिस्थितीत आम्ही ही संपूर्ण योजना टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, मात्र, मुंबईकरांना यासाठी थोडी वाट बघावी लागेल. प्रथम आम्ही मशीन आणण्यासाठी आणि ठेवण्यासाठी योग्य जागा शोधत आहोत. हे तंत्र देखील खूप महाग आहे. ते मिळवण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागेल.
प्रोटॉन बीम थेरपी म्हणजे काय?
सध्या कर्करोगाच्या रूग्णांना रेडिएशन थेरपी दिली जाते. पण या प्रक्रियेमध्ये रूग्णाच्या कर्करोगाच्या पेशींबरोबरच चांगल्या पेशी नष्ट होतात. तर, प्रोटॉन थेरेपी फक्त कर्करोगाच्या पेशींचा नाश करते. हे मशीन कर्करोगाच्या रुग्णांवर अगदी अचूक उपचार देऊ शकेल.
देशात फक्त 2 मशीन्स -
प्रोटॉन बीम थेरेपी मशीन खूप महाग आहे. फक्त मशीनची किंमत सुमारे 550 कोटी आहे. भारतात नुकतीच अपोलो चेन्नई आणि नवी मुंबईतील टाटा रुग्णालय प्रशासनाने ही मशीन मागवली आहे, मात्र, अजूनही नवीन तंत्रज्ञानाने उपचार सुरू झालेले नाहीत.
महत्त्वाची बातमी : हायकमांडकडून आला फोन, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची अधिकृत निवड
उपचार महाग -
परदेशात प्रोटॉन थेरपीद्वारे उपचारांचा खर्च 1 ते दीड कोटी रुपये आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही योजना अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे, म्हणूनच उपचारांच्या दराबद्दल विचार केला गेलेला नाही, मात्र, पालिका रुग्णांना अत्यंत किफायतशीर दराने उपचार उपलब्ध करुन देईल.
'या' कर्करोगांवर उपचार केले जातील -
प्रोटॉन बीम थेरेपीच्या साहाय्याने डोके, यकृत, मेरुदंड, मेंदू, फुफ्फुस, डोके आणि घसा, स्तन, आतडे, प्रोस्टेटच्या कर्करोगाचा उपचार करण्यास मदत मिळेल.
mumbai health news BMC is planning to bring proton beam machine for cancer patients
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.