Central Railway Service Affected due to problem on railway track breaks
Central Railway Service Affected due to problem on railway track breaks 
मुंबई

पावसाचा मध्य रेल्वेच्या प्रवाशांना फटका

कुलदीप घायवट

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची (central railway) वाहतुक ठप्प झाली होती. दादर ते कुर्ला दरम्यान पावसाचे पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती, तर, चुनाभट्टी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर (railway track) पाणी साचल्याने लोकल गाड्या जागीच खोळंबल्या होत्या. दादर ते कुर्ला दरम्यान सर्व लोकल सेवा बंद केल्या होत्या, तर हार्बर मार्गावरील चुनाभट्टी दरम्यान अत्यंत धीम्या गतीने लोकलला वेगमर्यादा ठेवून लोकल सुरू ठेवली. (Mumbai Heavy rain fall affected to central railway commuters)

त्यामुळे अनेक प्रवासी लोकलमध्ये अडकून पडले होते. पावसाचा जोर वाढल्यामुळे रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांना याचा फटका बसला. दादर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल जागीच खोळंबल्या होत्या. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी शनिवार, दुपारी 12.15 वाजता मध्य रेल्वेने दादर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद केली. तर, हार्बर मार्गावरील चुनाभट्टी दरम्यान लोकलला वेगमर्यादा घालून दिली आहे. इतर मार्गावरील लोकल सेवा हळुवारपणे सुरू आहे.

दादर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान लोकल सेवा दुपारी 12.15 वाजता बंद केली होती. मात्र, दुपारी 12.50 वाजता दादर ते कुर्ला स्थानकादरम्यान जलद मार्गावरील, दुपारी 1.15 वाजता धीम्या मार्गावरील लोकल सेवा सुरू केली. पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील अनेक लोकल गाड्या रेल्वे स्थानकात आणुन त्या रद्द करण्यात आल्या आहेत. पाण्यात अडकलेल्या लोकल गाड्यांमधून खाली उतरुन पाण्यातून वाट काढत प्रवाशांनी जवळचा रस्ता गाठण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT