Kirit Somaiya vs Hasan Mushrif esakal
मुंबई

Mumbai Court : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच मुश्रीफांना मोठा दिलासा; कोर्टानं अटकेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

मुश्रीफ यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातून शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई सत्र न्यायालयात मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.

मुंबई : मनी लॉण्डरिंगचा (Money laundering) आरोप असलेल्या आणि नुकत्याच राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या हसन मुश्रीफ यांना २२ ऑगस्टपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुश्रीफ यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातून शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

ईडीने (ED) मुश्रीफ यांच्याविरोधात दोन कारखान्यांतील व्यवहाराबाबत कारवाई सुरू केली आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या काही मालमत्तांवरही छापे टाकले आहेत. या पार्श्वभूमीवर अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

न्यायालयाने (Mumbai High Court) काल त्यांना दिलेल्या अंतरिम संरक्षणात वाढ केली. तसेच ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत तपास अधिकाऱ्यांनी सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई सत्र न्यायालयात मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. जावेद, आबिद आणि नावेद या तिन्ही मुलांना न्यायालयाने १९ जुलैपर्यंत दिलासा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT