sion-hospital 
मुंबई

सायन रुग्णालयातील 'त्या' व्हिडिओची उच्च न्यायालयाकडून दखल; न्यायालय म्हणाले...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सायन रुग्णालयात कोरोना बाधित मृतदेहांच्या बाजूलाच कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची गंभीर दखल आज मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. राज्यातील रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या मृतदेहांचे व्यवस्थापन आणि अंतिम प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते, याचा लेखी तपशील दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

सायन रुग्णालयासारख्या घटना घडता कामा नये याची दक्षता घ्या, असेही न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला बजावले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. 

सायन रुग्णालयाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून यामध्ये कोरोनाचे मृतदेह जमिनीवर किंवा रुग्णांच्या बाजूला खाटांवर ठेवलेले दिसत होते. असे प्रकार होऊ नये आणि या प्रकारांबाबत चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. खंडपीठानेही या घटनांबाबत चिंता व्यक्त केली असून असे प्रकार व्यवस्थापनाकडून होता कामा नये, असे मत व्यक्त केले. 

याबाबत चौकशी सुरू केली असून अद्याप अहवाल आलेला नाही, अशी माहिती महापालिकेच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ज्ञ अनिल साखरे यांनी खंडपीठाला दिली. याचिकेची व्याप्ती वाढवित असून राज्यभरातील रुग्णालये आणि प्रशासनांकडून कोरोना मृतदेहांचे व्यवस्थापन आणि अंतिम प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते, याची माहिती 1 जुलैपर्यंत दाखल करण्याचे निर्देश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी 3 जुलै रोजी होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT