मुंबई

...म्हणून आरोपीची जन्मठेप सहा वर्षांत वर्ग करता येत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचे मत

सुनिता महामुनकर

मुंबई : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे समाजावर होणाऱ्या परिणामांकडे डोळेझाक करता येत नाही. समाजातील अशा गुन्हेगारीला कठोर शासन देण्याची आवश्यकता आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. सहा वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या  खटल्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपी अरुमुगम अरूंदतीयारने न्यायालयात याचिका केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीची जन्मठेप सहा वर्षांमध्ये वर्ग करण्यास न्यायालयाने नकार दिला.

आरोपीचे त्याच्या एका मैत्रिणीवर प्रेम होते. परंतु पालकांच्या विरोधामुळे तिने लग्नाला नकार दिला होता. त्याचा राग ठेवून आरोपीने मे 2014 मध्ये भरदिवसा तिच्यावर चाकूने हल्ला केला होता. याप्रकरणी मागील सहा वर्षांपासून आरोपी कारागृहात आहे. भादंवि कलम 307 आणि 347 नुसार सत्र न्यायालयाने दोषी ठरवून त्याला जन्मठेप सुनावली आहे. 

माझी जन्मठेपेची शिक्षा रद्द करून ती सहा वर्षे करावी आणि माझी सुटका करावी, अशी मागणी याचिकेत केली होती. याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. गुन्ह्यामधील प्रत्यक्षदर्शी पुरावे आणि घटना या दोन्हीमध्ये समतोल राखणे महत्त्वाचे आहे. तसेच महिलांबाबत गुन्ह्यामध्ये सामाजिक परिणामांचाही विचार आवश्यक असतो आणि त्यावर आदर्शवत निर्णय आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे खंडपीठाने निकालात म्हटले आहे. 

आरोपीने केलेली सहा वर्ष शिक्षेची मागणी न्यायालयाने नामंजूर केली. मात्र, संबंधित प्रकरणातील घटनात्मक पुरावे पाहता आरोपीची जन्मठेपेची शिक्षा जास्त कठोर आहे. त्यामुळे ही शिक्षा दहा वर्ष सक्तमजुरी मध्ये वर्ग करीत आहे, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT