bombay high court  sakal
मुंबई

मानसिक आजारामुळे आरोपीला हत्येसारखी कृती करतोय हे कळले नाही : मुंबई HC

आजारामुळे त्याला आपण काही बेकायदेशीर कृती करीत आहोत हेच कळले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्क्रिझोफ्रेनिया आजारामध्ये असताना एकाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या छपन्न वर्षी आरोपीला आणि त्याच्या आईला मुंबई उच्च न्यायालयाने(mumbai high court) आरोपमुक्त केले आहे. आजारामुळे त्याला आपण काही बेकायदेशीर कृती करीत आहोत हेच कळले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

न्या एस एस शिंदे आणि न्या मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. आरोपी धनंजय पोरे आणि त्याची आई शंकुतला यांची न्यायालयाने सुटका केली. पोरे मागील दहा वर्षांपासून स्क्रिझोफ्रेनिया आजाराने त्रस्त आहे आणि त्याच्या वडिलांनादेखील हाच आजार होता असे न्यायालयात सांगण्यात आले. याबाबत वैद्यकीय कागदपत्रे आणि अहवाल दाखल करण्यात आला होता. तसेच तीन शेजारी आणि चार डॉक्टरांची साक्ष बचाव पक्षाने नोंदविले आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला. पोरेने मानसिक आजारपणात ही कृती केली असून याचा परिणाम आणि गुन्हेगारी स्वरूपाची कल्पना त्याला नव्हती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

अभियोग पक्षाच्या दाव्यानुसार पोरे आणि पिडीत पद्माकर हे एका देवळाबाहेर नारळ विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यावरून त्यांची वादावादी व्हायची. जुलै 2002 मध्ये पोरेने पद्माकरवर चाकूने हल्ला केला. यावेळी त्याची आई आणि पद्माकरची पत्नी देखील हजर होते. या हल्ल्यात पद्माकर गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा म्रुत्यु झाला. पोलिसांनी याबाबत पोरे आणि त्याच्या आईला अटक केली होती. न्यायालयाने आईला पुराव्याअभावी दोषमुक्त केले. यापूर्वी सत्र न्यायालयाने देखिल दोघांना निर्दोष जाहीर केले होते. राज्य सरकारने(maharashtra government) याविरोधात उच्च न्यायालयात (mumbai high court)अपील याचिका केली होती. न्यायालयाने याचिका नामंजूर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT