ambarnath  
मुंबई

Mumbai : गजब कारभार! नगरपालिकेतील फाईल्सचा रुग्णवाहिकेतून प्रवास; अंबरनाथ नगरपालिकेतील प्रकार

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली - अंबरनाथ नगरपालिकेच्या जुन्या प्रशासकीय इमारती मधील कामकाजाच्या फाईल्स नवीन इमारतीत हलविण्याचे काम सुरू आहे. या फाईल्सचा प्रवास कोणत्या टेम्पो मधून नाही तर रुग्णवाहिकेतून होत असून याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नगरपालिकेचा हा वेगळा कारभार पाहता काँग्रेसचे माजी नगरसेवक पंकज पाटील यांनी आक्षेप घेत रुग्णवाहिकेचा असा वापर करणे योग्य नाही असे म्हटले आहे.

अंबरनाथ नगरपालिकेची प्रशासकीय इमारत ही धोकादायक झाली असल्याने बाजूलाच नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या नव्या वास्तू मधून नगरपालिकेने आपला कारोभार सुरू देखील केला आहे. या नव्या वास्तू मध्ये जागा पुरेशी नसल्याने काही कार्यालय ही शहरातील पालिकेच्या इतर इमारतींमध्ये स्थलांतरित केली आहेत.

अंबरनाथ नगरपालिकेची जुनी प्रशासकीय इमारत पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने आता या इमारतीमधील महत्त्वपूर्ण फाईल्स सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे.

जुन्या प्रशासकीय इमारतीमधील कामकाजाच्या फाईल्स हलविण्यात येत असून या वाहतुकीसाठी चक्क रुग्ण वाहिकेचा वापर करण्यात आला आहे. मंगळवारी फाईल्सची वाहतूक करण्यासाठी पालिका प्रशासनाला इतर वाहन न मिळाल्याने रुग्णवाहिका बोलावून त्या रुग्णवाहिकेतून सर्व फाईल्स हलवण्याचे काम सुरू करण्यात आले.

फाईल्स हलवण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केल्याने नागरिक देखील चक्रावून गेले होते. दरम्यान रुग्णवाहिकेचा असा वापर पालिका प्रशासनामार्फत केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रुग्णवाहिकेचा असा वापर करता कामा नये, जुन्या फाइल्स हलविण्यासाठी इतर वाहनाचा वापर करावा असे काँग्रेस माजी नगरसेवक पंकज पाटील यांनी सांगितले आहे. तर याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT