washim red light area need help 
मुंबई

कामाठीपुऱ्यात शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या लसीकरणाचं काय?

या सगळ्यांमध्ये दुर्लक्ष होतेय, ते....

दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Corona second wave) लसीकरणाबद्दल प्रचंड जागरुकता निर्माण झालीय. मुंबईत तर, लसीकरण केंद्रांवर लांबलचक रांगा दिसतात. सर्व वयोगटातील नागरिक लस टोचून घेण्यासाठी इच्छुक आहेत. सरकार आणि महापालिकेकडून सर्व वयोगट आणि घटकांचा लसीकरणासाठी (vaccination) विचार होतोय. लवकरात लवकर सर्व वयोगटाचे लसीकरण करता यावे, यासाठी BMC ने लस खरेदीसाठी निविदाही काढल्या आहेत. पण या सगळ्यांमध्ये दुर्लक्ष होतेय, ते शरीरविक्रय करणाऱ्या महिलांकडे. (Mumbai Kamathipura area Myths govt apathy leave women out of vaccination drive)

मुंबईत शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचे लसीकरण होणेही, तितकेच महत्त्वाचे आहे. पण अजून या समाज घटकाकडे म्हणावे तितके लक्ष देण्यात आलेले नाही. मुंबईतील कामाठीपुरा हा भाग शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी ओळखला जातो. इथे राहणाऱ्या महिलांच्या मनात लसीकरणाबद्दल बरेच गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर आपण आजारी पडतो, मृत्यू होतो, असे काही चुकीचे ग्रह त्यांनी करुन घेतले आहेत.

कुठलीही शहानिशा न करता व्हॉट्स अ‍ॅपवरुन फॉरवर्ड होणाऱ्या मेसेजेसमुळे त्यांच्या गैरसमजांमध्ये अधिकच भर पडली आहे. शरीरविक्रय हा इथल्या महिलांचा मुख्य व्यवसाय. मार्च २०२० मध्ये कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन करण्यात आलं. तेव्हापासून इथे फारसे ग्राहक फिरकलेले नाहीत. "सध्याच्या परिस्थितीत एखादा ग्राहक आला आणि मी आजारी आहे, म्हणून तो निघून गेला, तर ते मला परवडणार नाही. त्यामुळे मी लस घेणारच नाही" असे एका महिलेने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

लसीकरणाबद्दल या महिलांच्य मनात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी महापालिकेने कामाठीपुऱ्यात लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने २०२०-२१ मध्ये कामाठीपुऱ्यातील १७,६०० शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची वैद्यकीय तपासणी केली होती. यावरुन या भागात शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची संख्या किती आहे? आणि लसीकरणासाठी कशी तयारी करावी लागेल, त्याचा अंदाज येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT