Mumbai-Local-Megablock 
मुंबई

Mumbai Local: जाणून घ्या, २८ मार्चच्या रविवारी कोणत्या मार्गावर असेल मेगाब्लॉक

विराज भागवत

मुंबईची लाइफलाईन असलेल्या लोकलच्या तिन्ही मार्गांवर दररोज शेकडो रेल्वे धावतात. या रेल्वे गाड्यांची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी तिन्ही मार्गांवर किंवा काही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येतो. येत्या रविवारी म्हणजेच २८ मार्चला मध्य मार्गावर मेगा ब्लॉक नसला तरी हार्बर मार्गावर आणि खारकोपर हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११ वाजून ०५ मिनिटं ते संध्याकाळी ४ वाजून ५ मिनिटे या दरम्यान नेरूळ / बेलापूर-खारकोपर हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बंद असणार आहे.

अप हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरीता पनवेलहून सकाळी १० वाजून ४९ मिनिटे ते सायंकाळी ४ वाजून ०१ पर्यंत सुटणाऱ्या रेल्वे गाड्या तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १० वाजून ०३ मिनिटे ते दुपारी ३ वाजून १६ मिनिटांपर्यंत पनवेल / बेलापूरला जाणा-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेलहून सकाळी ९ वाजून ०१ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ५३ मिनिटे या वेळेत ठाणेकडे जाणार्‍या ट्रान्सहार्बर मार्गावर आणि ठाणेहून सकाळी १० वाजून ०१ मिनिटे ते दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

कोणत्या रेल्वे सेवा सुरू राहणार?

मेगाब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांच्या सोयीकरीता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी या मार्गावर विशेष लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. मेगा ब्लॉकच्या कालावधीत ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.

पश्चिम रेल्वेवर दिवसा मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याने त्या लाइनवरील सर्व रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार धावतील. तसेच मेन लाइन म्हणजेच मध्ये रेल्वेवरही मेगाब्लॉक नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर रेल्वे सेवा सुरू असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT