mumbai local file photo
मुंबई

Mumbai Local : रविवारी मुंबईच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

सकाळ डिजिटल टीम

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, २६ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप-डाऊन धीम्या मार्गावर; तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर अप-डाऊन जलद मार्गावर शनिवारी-रविवारी (ता. २५, २६) रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : ठाणे ते माटुंगा, अप-डाऊन धीमा मार्ग
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५
परिणाम : ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर धावतील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. त्यापुढे धिम्या मार्गावरून चालवण्यात येतील; तर कल्याण येथून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकात या लोकल थांबतील. पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावरून त्या मार्गस्थ होतील.

हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल ते वाशी, अप-डाऊन मार्ग
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन लोकल रद्द राहतील. पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल आणि ठाणे येथून पनवेलकरीता सुटणाऱ्या डाऊन लोकलही रद्द राहतील. तसेच नेरुळ-ठाणे, ठाणे-नेरूळ लोकलही रद्द राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली ते भाईंदर, अप-डाऊन जलद मार्ग
वेळ : शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३०
परिणाम : ब्लॉकदरम्यान बोरिवली ते भाईंदर स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा विरार/वसई रोड ते बोरिवली स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. याशिवाय काही लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड सामन्याची वेळ काय?... जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री LIVE मॅच...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

SCROLL FOR NEXT