Mumbai Local News goregaon sakal
मुंबई

Mumbai Local News: गोरेगाव जलद लोकल रद्द करण्याचा घाट; महिला प्रवाशांनी राबविली स्वाक्षरी मोहीम!

विरार, बोरीवली येथून चर्चगेटच्या दिशेने सर्वाधिक जलद लोकल धावतात |Fastest local runs from Virar, Borivali towards Churchgate

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: एसी लोकल सुरू झाल्यावर रेल्वेने मध्य आणि पश्चिम सामान्य अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या. त्यावरून पश्चिम आणि मध्य रेल्वेला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

त्यात आता पश्चिम रेल्वे प्रशासनाने उपनगरीय मार्गावरून सकाळी वर्दळीच्या वेळी गोरेगाव येथून सकाळी सुटणारी ९.५३ लोकल रद्द करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही लोकल सुरू ठेवावी यासाठी विशेषतः महिला प्रवाशांनी लोकलमध्ये स्वाक्षरी अभियान राबविले आहे.

विरार, बोरीवली येथून चर्चगेटच्या दिशेने सर्वाधिक जलद लोकल धावतात. या जलद लोकल मधल्या मार्गावर थांबत नाही. त्यात बोरिवलीहुन सुटणाऱ्या सेमी फास्ट लोकल या बोरिवली ते मालाड दरम्यान पूर्णपणे प्रवाशांनी भरून गोरेगावला येतात.

त्यामुळे गोरेगावकर प्रवाशांना लोकलमध्ये चढायलाही जागा मिळत नाही. काही प्रवासी नाईलाजाने मग लोकलमधून पायरीवर उभे राहून प्रवास करतात. गोरेगावकर प्रवाशांच्या या समस्या लक्षात घेता तत्कालीन खासदार गजानन कीर्तिकर यांनी सतत रेल्वे प्रशासनाशी पाठपुरावा करून त्यावेळी गोरेगावहुन सुटणाऱ्या जलद लोकल सेवा सुरू केल्या होत्या.

गेल्या १० ते १२ वर्षांहून अधिक काळ गोरेगावहुन सकाळी वर्दळीच्या वेळी ८. २७ पासून अर्धा तासाच्या अंतराने ९.५३ पर्यँत चार जलद लोकल सेवा सुरू आहे.या लोकलमध्ये मालाड ते दहिसर मार्गावरीलही अनेक प्रवासी उभ्याने चर्चगेटपर्यंतचा इतर लोकलने प्रवास करू नये म्हणून या गोरेगाव जलद लोकलने प्रवास करतात.

या सर्व लोकल गोरेगाव नंतर जोगेश्वरी येथून पूर्णपणे प्रवाशांनी भरल्या जातात.असे असताना पश्चिम रेल्वेने ९.५३ ची लोकल बंद करण्याचा घाट घातल्याने प्रवाशांनी नापसंती व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT