Mumbai Local 
मुंबई

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

Mumbai Local News: सकाळी कामावर जाणाऱ्या आणि संध्याकाळी कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई,ता.१३ : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी सिग्नल यंत्रणेत झालेला बिघाड आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे ओव्हर हेड वायरमध्ये झालेल्या विविध तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीचे पूर्णता तीन तेरा वाजले. या घटनांमुळे मध्य रेल्वेवर दीडशे लोकल फेऱ्या रद्द झाल्या आणि शेकडो लोकल फेऱ्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या आणि संध्याकाळी कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

सोमवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्व मार्गिकेवरील सिग्नल यंत्रणा कोलमडली होती. त्यामुळे कल्याण ते कुर्ला दरम्यान लोकल सेवा खोळंबली होती. या घटनेची माहिती मिळण्यास मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले. पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर सिग्नल यंत्रणेतला बिघाड सकाळी १० वाजून १५ मिनिटात दुरुस्त करण्यात आला.

परंतु, या घटनेमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा एका मागे एक खोळंबल्या होत्या. तसेच लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत जात नजीकचे रेल्वे स्थानक गाठत असल्याचे चित्र दिसून आले. या घटनेमुळे कल्याणहून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या तब्बल २० मिनिटं उशीराने धावत होत्या. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना कार्यलयात पोहचण्यासाठी लेटमार्क बसला आहे.

झाडाची फांदी कोसळी-

सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारसास मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. सर्व प्रथम दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान झाडाची फांदी रेल्वेच्या ओव्हर हेड वायर पडल्याने काहीकाळ बदलापूर ते कर्जत दरम्याची रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती.

ओएचईच्या खाब वाकला -

संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास मुलुंड ते ठाणे स्थानकांदरम्यान डाउन मार्गावरील ओएचई वायरचा खाब वाकल्याने ठाणेकडे जाणाऱ्या लोकल सेवा खोळंबल्या होत्या. त्यानंतर डाउन मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळविण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल होऊन वाकलेल्या खाब दुरूस्ती करण्याचे काम रेल्वेने हाती घेतले. संध्याकाळी ६.५६ वाजता हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. या बिघाडामुळे ठाणेकडे जाणाऱ्या जलद आणि धीम्या लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडून पडले.

मुंबईकरांचे प्रचंड हाल-

वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशाची सुरक्षितता लक्षात घेऊन लोकल सेवांचा वेग कमी करण्यात आला होता. त्यामुळे मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल सेवा विलंबाने धावत होत्या. विशेष म्हणजे सकाळी सिग्नल बिघाड त्यानंतर दुपारी वादळी वाऱ्यासह पावसामुळे दिवसभर मध्य रेल्वेच्या वाहतूकीला फटका बसला. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या आणि संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT