Mumbai Local News sakal
मुंबई

Mumbai Local: टॅक्सी चालकांची अरेरावी सुरूच ; स्थानकांबाहेर प्रवाशांची लूट   

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local: मुंबईत टॅक्सीचालकांकडून भाडे नाकारले जात असल्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. रात्री-बेरात्री भाडं नाकारले जाणे असो किंवा मग जवळचे भाडे नाकारणे असो यामुळे मुंबईकरांना अनेकदा त्रासाला सामोर जावे लागते.

सीएसएमटी आणि दादर रेल्वे स्थानकाबाहेर लांबपल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात असून त्या मुजोर टॅक्सी चालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे. 

एका प्रवाशाने वाहतूक पोलिसांच्या एक्स  अकाउंटवर टॅक्सी चालकाबाबत तक्रार केली आहे. त्यामध्ये  नागपूर दुरांतो ट्रेन सारख्या लांबपल्ल्याच्या गाड्यातून  येणाऱ्या प्रवाशांकडून टॅक्सी चालक जादा भाडे आकारत आहे. सीएसएमटी ते गोल देऊळ मंदिर येथे  जाण्यासाठी २०० रे २५० रुपयांची मागणी  करत आहेत. 

तर अन्य एका प्रवाशाने सांगितले कि, दादर रेल्वे स्थानकाबाहेर सातत्याने भाडे नाकारले जात आहे. मीटरचे भाडे नाकारून मनमानी भाडे मागितले जाते. एक किमी च्या अंतरासाठी ७० रुपयांची मागणी केली. जेव्हा त्या प्रवाशाने व्हिडीओ काढला त्यावेळी मीटर चालत नसल्याचे सांगून सारवासारव केली. 

टॅक्सी चालकांनी भाडे नाकारले तर आधीच चिडचिड होते आणि त्यात एखाद्या महत्वाच्या कामासाठी जायचे असेल तर वाद घालण्यातही काही उपयोग नसतो. रिक्षा टॅक्सी चालक अनेकदा लांब पल्ल्याच्या भाड्यासाठी जवळचे भाडे नाकारतात. या बद्दलच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.

त्यामुळे अशा प्रकारचे भाडे नाकारणाऱ्या  टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाते. परंतु तक्रार करण्यासाठी प्रवासी पुढे येत नाहीत. त्यामुळे  रिक्षा टॅक्सी चालकांची मुजोरी वाढली आहे. मुंबईतील आरटीओ कार्यालयांनी  इमेल आयडी आणि व्हाट्स अप क्रमांक दिल्याने प्रवासी तक्रारीसाठी पुढे येत आहेत.त्यांनतर कारवाई होऊनही टॅक्सी चालकांना फरक पडत नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT