मुंबई : हार्बर मार्गावरील कुर्ला ते टिळकनगर स्थानकांदरम्यान नवीन रेल्वेलाइन टाकण्यात येत आहे. नवीन लाइनच्या कामासाठी वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यान तब्बल साडेचौदा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री ११.०५ ते रविवारी दुपारी १.३५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत पनवेल ते सीएसएमटीदरम्यान शेवटची लोकल रात्री ९.५२ वाजता, सीएसएटी ते वाशी- बेलापूर- पनवेल लोकल रात्री १०.१४ वाजता चालविण्यात येणार आहे.
ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर पनवेल स्थानकातून सीएसएमटीकरिता पहिली लोकल रविवारी दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी, तर सीएसएमटी ते पनवेल लोकल दुपारी दीड वाजता चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी मानखुर्द ते पनवेलदरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे.
कुठे - ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गांवर
कधी - रविवार (ता. १४) सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत
परिणाम - ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल केला आहे. पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस हजूर साहिब नांदेड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन, मंगलुरु जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस, पटना-एलटीटी एक्स्प्रेस, काकीनाडा-एलटीटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस, चेन्नई-सीएसएमटी एक्स्प्रेस, सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, बनारस-एलटीटी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, हटिया-एलटीटी एक्स्प्रेस, कोयंबतूर-एलटीटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, एलटीटी-जयनगर एक्स्प्रेस, एलटीटी-तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस १० ते १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
कुठे - बोरिवली आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर
कधी - रविवारी मध्यरात्री ००.३० ते पहाटे ४.३०
परिणाम - ब्लॉक काळात बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावर वळवल्या जातील. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे या गाड्या राममंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन गाड्या रद्द केल्या जातील आणि काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. तसेच रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसणार आहे.