Mumbai Local  esakal
मुंबई

Mumbai Local : मुसळधार पावसातही आता समजणार मुंबई लोकलचे लाईव्ह लोकेशन, कसे जाणून घ्या सविस्तर

भरपावसातही मुंबईकरांना आता लोकलचे लाइव्ह लोकेशन समजू शकणार आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Mumbai Local Train Yatri App In Marathi :

मुंबईतला पाऊस हा सगळ्यांच्याच माहितीचा आहे. अशा मुसळधार पावसात पाणी साचणे, लोकल लेट होणे असे प्रकार बऱ्याचदा घडतात. त्यामुळे पावसात ट्रेन कुठे थांबलीये, स्टेशनवर यायला किती वेळ होणार असे अनेक प्रश्न लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना पडतात.

पण आता या पावसातही मुंबईकरांची ही अडचण सोडवणारं एक अॅप आलं आहे. ज्यामुळे लोकलचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे.

मध्य रेल्वेने यात्री अॅप मागच्या वर्षीच लाँच केले होते. या अॅपच्या माध्यमातून लोकल प्रवाशांना मध्य आणि पश्चिम रेल्वेचे रियल टाईम लाईव्ह लोकेशन कळणार आहे. या अॅपच्या एका क्लिकवर प्रवाशांना ट्रेनचे लाईव्ह अपडेट्स, घोषणा, ताजे घोषणापत्रक, प्रमुख रेल्वेस्थानकांचे नकाशेदेखील मिळणार आहेत.

पश्चिम आणि मध्य रेल्वेने आपल्या ताफ्यातल्या सर्व रेल्वे गाड्यांना जीपीएस यंत्रणा लावली आहे. त्यामुळेच लोकलची सद्य स्थिती आणि अपेक्षित स्थानकावर कधी पोहचणार हे प्रवाशांना मोबईलवर समजते.

मध्ये रेल्वेच्या या अॅपला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्हीसाठी उपलब्ध आहे. पश्चिम रेल्वेच्या ९३ उपनगरीय रॅकवर जीपीएस डिव्हाइस इन्स्टॉल करण्यात आली आहेत. तसेच एसी लोकलसाठीही ही जीपीएस यंत्रणा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रेनचे रियल टाईम लोकेशन सांगता येते.

हे लोकेशन कसे तपासावे, जाणून घ्या.

ट्रेनचे लोकेशन कसे तपासणार?

  1. तुम्ही जिथे आहात ते स्टेशन निवडा

  2. ज्या ठिकाणी जायचे तिथल्या प्रवासाची दिशा निवडा.

  3. ट्रेनचे लाईव्ह लोकेशन मिळवण्यासाठी ट्रेनच्या टाईम टेबलवर क्लीक करा.

अॅपचा अलर्ट सेट करायचाय?

  • जिथे आहात त्या स्टेशनवरून ट्रेन निवडा.

  • ५ ते ३ मिनीटे किंवा निवडलेल्या दिवसाआधीचाही अलर्ट सेट करता येतो.

  • दर १५ सेकंदांनी अॅप ऑटो रिफ्रेश होतो. युझर्स लेटेस्ट डेटासाठी रिफ्रेशवर क्लिक करू शकतात.

दिव्यांगांसाठीही यात्री अॅप आहे. ते व्हॉइस कंमांडने मोबाईल हाताळू शकतात. गुगल असिस्टंटद्वारे त्यांच्या ट्रेनचे थेट लोकेशन सहज शोधू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT