मुंबई

नवरा अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करतो, MNC मध्ये काम करणाऱ्या महिलेचा आरोप

महिलेचा नवरा एका मोठ्या वित्तीय कंपनीत उपाध्यक्षपदावर असून महिला सुद्धा स्वत: एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करते.

दीनानाथ परब

मुंबई: नवरा अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करतो म्हणून मुंबईत राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेने (mumbai women) नवऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात (Police station) तक्रार नोंदवली आहे. महिलेचा नवरा एका मोठ्या वित्तीय कंपनीत उपाध्यक्षपदावर (vice president) असून महिला सुद्धा स्वत: एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करते. नवऱ्याबरोबरच तिने सासू-सासरे आणि कुटुंबीयांवरही हुंड्यासाठी (dowry) छळ करत असल्याचा आरोप केला आहे.

महिलेने पवई पोलीस ठाणे गाठले. तिने कुटुंबातील आठ सदस्यांवर हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला आहे. आयपीसीच्या कलम 498 अ आणि 377 (अनैसर्गिक शरीरसंबंध) या कलमांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. अजून या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही. तपास सुरु आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

2013 मध्ये माझे लग्न झाले. त्यानंतर सासू-सासरे, दीर आणि नवऱ्याने सुद्धा हुंड्यासाठी माझा छळ सुरु केला, असे महिलेने पोलिसांनी दिलेल्या जबानीत म्हटले आहे. नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना वेळोवेळी मी आर्थिक मदत केली, तरी त्यांनी अनेकद मला मारहाण केली, असा आरोप महिलेने केला आहे. अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्यासाठी नवरा आपल्यावर जबरदस्ती करतो, असा आरोपही महिलेने तिच्या तक्रारीत केला आहे. रोजच्या होणाऱ्या या त्रासाला कंटाळून महिलेने अखेर तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT