मुंबई

मुंबई पालिकेनं नितेश राणेंच्या ट्विटला 'असं' दिलं सडेतोड उत्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर अजून सुरुच आहे. मुंबई शहरात या व्हायरसचा जास्त प्रार्दुभाव आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. मुंबई पालिकेनं शहरातल्या अनेक भागात आयसोलेशन केंद्र आणि क्वारंटाईन सेंटर उभारले आहेत. त्या त्या केंद्रात रुग्णांना ठेवण्यात आहे. अशातच वरळीतल्या NSCI क्लबमध्ये 650 बेड्सची क्षमता असलेलं आयसोलेशन सेंटर आहे. आता याच आयसोलेशन सेंटरमधील एक व्हिडिओ भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शेअर केला होता. त्यावर मुंबई महापालिकेनं सडेतोड उत्तर दिलं. इतकंच काय तर पालिकेच्या ट्विटला ही नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

नितेश राणे यांनी NSCI क्लबमधील एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत रुग्ण लुंगी डान्स या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओ शेअर करुन त्यांनी एनएससीआय बॅडमिंटन कोर्ट !!!
या सर्वांवर कोण नजर ठेवून आहे किंवा
नाईट लाईफ अजूनही चालू आहे ??  

या ट्विटमध्ये त्यांनी नाईट लाईफ अजूनही चालू आहे असा सवाल उपस्थित करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसंच या सर्वांवर कोण नजर ठेवून आहे अशीही विचारणा केली. 

त्यावर मुंबई महापालिकेनं आपल्या अधिकृत ट्विटर हॅडलवरुन नितेश राणेंना सडेतोड उत्तर दिलं आहे. पालिकेनं त्या आयसोलेशन सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे कशा पद्धतीनं लक्ष ठेवलं जात आहे, त्याचा फोटो पोस्ट केला. पालिकेनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, महोदय, हा एनएससीआयचा व्हिडिओ नाही किंवा तेथे कोविड सुविधेसाठी कोणतेही बॅडमिंटन कोर्ट वापरले जात नाही. कृपया स्पष्टतेसाठी कॅमेऱ्यातील वेळ आणि तारीख तपासा. कोविड-19 मध्ये लढा देणाऱ्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि आनंदाची शुभेच्छा.

पालिकेनं ट्विट हे सेंटर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असल्याचे फोटो शेअर केलेत. तसंच राणे यांनी शेअर केलेला व्हिडिओ या आयसोलेशन सेंटरमधील नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पालिकेच्या ट्विटवर पुन्हा नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पालिकेच्या अधिकृत ट्विटर हॅडलला टॅग करत त्यांनी लिहिलं की, स्पष्टीकरण दिल्यानं आनंद झाला. अन्यथा पालिका तरीही वास्तविक माहिती लपवण्यात व्यस्त आहे. आम्ही लक्ष ठेवून राहू, शुभेच्छा!

याआधीही शेअर केला अन्य व्हिडिओ 

वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (BKC) मैदानावर एक हजार खाटांची क्षमता असलेलं जम्बो रुग्णालय उभारण्यात आलं आहे. या रुग्णालयाला बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला असल्याची माहिती सोशल मीडियातून पसरवण्यात आली होती. चक्रीवादळामुळे या रुग्णालयाचं मोठं नुकसान झाल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. मुंबई महापालिकेने हा दावा खोडून काढत हे रुग्णालय संध्याकाळपर्यंत पूर्ववत होणार असल्याचं म्हटलं होतं. 

या वादळामुळे बीकेसीतील रुग्णालयाचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियातून पसरवण्यात आली. ती खोटी आहे. या सगळ्या अफवा आहेत, असं महापालिकेनं म्हटलं आहे. या रुग्णालयाचे काही फोटो देखील महापालिकेने शेअर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT