corona center Mumbai
corona center Mumbai sakal media
मुंबई

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर BMC सज्ज; जम्बो कोविड सेंटरमध्ये 'या' सुविधा

भाग्यश्री भुवड

मुंबई : देशभरात ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गात (omicron infection) वाढ होत असताना मुंबई महानगरपालिका (bmc) सज्ज झाली आहे. मुंबईतील (Mumbai) पहिले पूर्णतः ऑक्सिजन खाटांनी सज्ज असे जंबो कोविड सेंटर (Jumbo corona center) लवकर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे. (Mumbai municipal corporation ready for omicron fight jumbo corona center with full oxygen facility starting soon)

15 दिवसांत सुरु होणार जंबो केंद्र

चुनाभट्टी येथील सोमय्या ट्रस्टच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या या कोविड सेंटरच्या कामाचा आढावा खासदार राहुल शेवाळे यांनी घेतला. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुजाता पोळ, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. रविकिरण गोळे, कार्यकारी अभियंता प्रशांत धात्रक, पालिकेचे कार्यकारी अभियंता नामदेव तळपे, सोमय्या ट्रस्ट चे पदाधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. म्हाडाच्या वतीने उभारण्यात आलेले हे सेंटर येत्या 15 दिवसांत सुरू होणार असून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत हे सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला.

1200 खाटांना ऑक्सिजन सुविधा

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन चुनाभट्टी येथील सोमय्या ट्रस्टच्या सुमारे 18 हजार स्क्वेअर मीटर जागेत म्हाडाच्या वतीने हे जंबो कोवीड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्वच्या सर्व 1200 खाटांना  ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा असून याठिकाणी अतिदक्षता विभाग आणि लहान मुलांसाठीही विशेष विभाग सुरू करण्यात येणार आहे.

वैशिष्ट्ये

सायन- चुनाभट्टी जंबो कोविड सेंटर

सुमारे 18 हजार स्क्वेअर मीटर जागेत एकूण 8 युनिट

म्हाडाच्या वतीने सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून सेंटर उभारण्यात आले.

1024 खाटा ऑक्सीजन पुरवठा युक्त

अतिदक्षता विभागात एकूण 210 खाटा

-लहान मुलांसाठी ऑक्सिजन आणि अतिदक्षता मिळून सुमारे 250 खाटा उपलब्ध

याच ठिकाणी सुमारे 40 किलो लिटर क्षमतेचा लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन प्लांट

अखंड ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन जनारेटींग प्लांट

आपत्कालीन वापरासाठी प्रत्येकी 10 लिटर चे 300 ऑक्सिजन सिलेंडर तैनात

पूर्णपणे ऑक्सिजन युक्त खाटा उपलब्ध असलेला आणि ऑक्सिजनचा अखंड पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था असलेल्या या सेंटरमुळे पूर्व उपनगरातील नागरिकांना कोरोना संकटात मोठा दिलासा मिळू शकेल.

- राहुल शेवाळे, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT