मुंबई

समृद्धी महामार्गाला देण्यात येणार 'हे' नाव, मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाबाद्द्ल एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळात समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर जवळपास शिकामोर्तब झालाय. हा महामार्ग मुंबई ते नागपूरला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग मानला जातोय.

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी ठेवला. या मागणीवर सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे लवकरात लवकर समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याबाबत कार्यवाही होणार आहे.   

"समृद्धी महामार्गाचं काम येत्या तीन वर्षात पूर्ण होणार आहे. दरम्यान समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रात गेमचेंजर ठरणार आहे. या महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई जवळ येणार आहेत. या महामार्गामुळे महाराष्ट्रात विकास व्हायला मदत होणार आहे", असं मत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय. 

समृद्धी महामार्गाबाबत थोडक्यात 

  • समृद्धी महामार्ग हा तब्बल  ७०१ किमी लांबीचा आठ पदरी महामार्ग  असणार आहे. 
  • हा महामार्ग महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला जोडणार आहे. 
  • हा महामार्ग महाराष्ट्रातील 10  जिल्ह्यातून, 26 तालुक्यांतून आणि 390  गावांमधून जाणार आहे
  • या महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईमधील प्रवास ८ तासात पूर्ण करता केणार आहे 
  • या प्रकल्पासाठी 46 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे 
  • या महामार्गासाठी आठ हजार सहाशे तीन हेक्टर जमिनीची गरज आहे

गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं, यासाठी शिवसेना पुढाकार घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता लवकरात लवकर समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याबाबत कार्यवाही होणार असल्याने शिवसेनेची मागणी पूर्ण होताना पाहायला मिळतेय. 

Webtitle : mumbai nagapur samruddhi highway will get this name decision taken in state cabinet

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT